स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे सौंदर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

  • उपमुख्यमंत्र्यांकडून नाट्यगृहाची पाहणी

पुणे, दि. १०: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या हडपसर येथील राजर्षी शाहू महाराज संकुलामधील स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी नाट्यगृहाचे सौंदर्य अबाधित राहील यादृष्टीने स्वच्छता, नियमित देखभाल दुरुस्ती याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (सांस्कृतिक) सुनील बल्लाळ, मुख्य अभियंता (भवन) युवराज देशमुख, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक सुनील बनकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुणेकरांना मुळातच नाटकाची आवड आहे. त्यामुळे येरवडा, वडगाव शेरी, पिंपरी- चिंचवड आदी भागांसह हडपसर येथे अद्ययावत नाट्यगृह असण्याची गरज होती. हडपसर येथे स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे काम झाल्यामुळे येथील नाट्यप्रेमी, कलाप्रेमींना लाभ होणार आहे.

यावेळी आयुक्त डॉ. भोसले यांच्याशी चर्चा करताना ज्या इमारती अगदी थोड्या निधीअभावी अपूर्ण आहेत त्या पूर्ण कराव्यात, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यानुसार २२ अपूर्ण इमारतींना प्राधान्याने निधीची तरतूद करुन पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

नाट्यगृहाचे भाडे १० हजार रुपये ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यावर नाट्यनिर्माते, दिग्दर्शकांशी  बैठक घेऊन महानगरपालिकेलाही  परवडेल आणि नाट्यनिर्मात्यांनाही परवडेल असे भाडे निश्चित केल्यास अधिकाधिक नाटकांचे खेळ होऊन महापालिकेला नाट्यगृहाच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळू शकेल. नाट्यगृहाच्या छतावर सौर पॅनेल बसून वीज निर्मिती करता येईल तथापि, छोट्या आकारात जास्त वीज तयार करणारे अत्याधुनिक सौर पॅनेलचे तंत्रज्ञान येत असल्याने त्यादृष्टीने निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाची वैशिष्ट्ये

पुणे महानगरपालिकेच्यावतीने सन २०११ साली हडपसर येथे एकूण २ एकर जागेत ५ हजार ७६७ चौ.मी. क्षेत्रफळाचे स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. या नाट्यगृहाची तळमजला व ३ मजले अशी रचना करण्यात आली आहे. तळमजल्यावर लोडिंग अनलोडिंग  रॅम्प, तिकीट कक्ष, कॅफेटेरिया आहे. नाट्यगृहाची एकूण आसन क्षमता ८३८ इतकी असून स्टेजसमोर ६५९ आसणे व बाल्कनीमध्ये १७९ इतकी आसन अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे ९० बाय ४५ फूट मापाची भव्य रंगभूमी (स्टेज) उभारण्यात आली आहे.

समोरील भागात मोठा आकर्षक व प्रशस्त प्रवेशमार्गिका करण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या तळ मजला येथे अतिमहत्वाच्या व्यक्तींकरता कक्ष असून तळमजला व पहिला मजला येथे एकूण १० ग्रीन रूम्स आहेत. येथे १०७ चारचाकी व ३५७ दुचाकी वाहनांकरीता वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

संपूर्ण नाट्यगृह अद्ययावत सुविधांनी युक्त, वातानुकुलीत असून सिलिंग व भिंतीला अकॉस्टिकल प्रक्रिया करण्यासाठी सलून स्लॅटचा वापर करण्यात आला आहे. तसेच त्यामध्ये स्टेच फॅब्रिकचा वापर डिझाईनसाठी करण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज संकुलामध्ये तिसऱ्या मजल्यावर चित्रप्रदर्शन व कलाप्रेमींसाठी सुमारे १० हजार चौरस फुटाचे कलादालन करण्यात आलेले आहे. या सर्व कामाकरीता सुमारे ५० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...