एनटीपीसीची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाल्याची घोषणा
पुणे,: नूतनीकरणीय ऊर्जा सुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी, सुझलॉन ग्रुपने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये दमदार कामगिरी बजावल्यानंतर, आता भारतातील सर्वात मोठी पवन ऊर्जा ऑर्डर मिळाली असल्याची घोषणा केली आहे. ११६६ मेगावॅटची ही ऑर्डर एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून (भारतातील सर्वात मोठा ऊर्जा उद्योग समूह एनटीपीसी लिमिटेडची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी) मिळाली असल्याची घोषणा सुझलॉनने केली आहे. या ऑर्डरनुसार सुझलॉन एस१४४ चे एकूण ३७० विंड टर्बाईन जनरेटर्स (डब्ल्यूटीजी) इन्स्टॉल करेल. त्यासोबत एक हायब्रिड लॅटिस टुब्यूलर (एचएलटी) असेल. गुजरात राज्यामध्ये एनटीपीसी रिन्यूएबल्स एनर्जी लिमिटेडच्या (एनजीईएलची संपूर्ण मालकीची उपकंपनी) दोन प्रकल्पांमध्ये प्रत्येकी आणि इंडियन ऑइल एनटीपीसी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा एक प्रकल्प (एनजीईएलची समूह कंपनी) यांची ३.१५ मेगावॅट क्षमता असणार आहे. या ऑर्डरमुळे आता सुझलॉनचे सर्वात मोठे ऑर्डर बुक ३ सप्टेंबर २०२४ रोजी ५ गिगावॅटवर जाऊन पोहोचले आहे.
सुझलॉन ग्रुपचे उपाध्यक्ष श्री गिरीश तंती म्हणाले, “देशातील सर्वात मोठी पवन ऊर्जा ओईएम या नात्याने आम्हाला भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडची नूतनीकरणीय ऊर्जा कंपनी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडसोबत सहयोग करताना अतिशय आनंद होत आहे. हा सहयोग एक महत्त्वाचा टप्पा असून भारतात घडून येत असलेल्या नूतनीकरणीय ऊर्जा परिवर्तनाचा वेग वाढवण्याप्रती आमची बांधिलकी त्यामुळे अधिक दृढ झाली आहे. एनजीईएलकडून आम्हाला मिळालेली ही पहिली थेट पवन ऊर्जा ऑर्डर आहे, ज्यामुळे सुझलॉनने पीएसयू ग्राहक विभागात विजयी पुनरागमन केले आहे.
हा प्रकल्प गुजरात राज्यात एक पीएसयूमार्फत उभारला जात असलेला सर्वात मोठा पवन ऊर्जा उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुजरात राज्याची आघाडी अधिक मजबूत होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील प्रकल्पांसाठी एक नवा मापदंड ठरेल, भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेमध्ये लक्षणीय योगदान देईल, आर्थिक सुबत्ता आणेल. २०३२ सालापर्यंत ६० गिगावॅट नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवण्याचे एनजीईएलचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यात या प्रकल्पाची भूमिका खूप मोलाची असणार आहे.”