पुणे- एका अल्पवयीन मुलाला पकडून पुणे पोलिसांनी त्याच्याकडून २ चोरीच्या दुचाक्या आणि ७ चोरीचे मोबाईल हॅन्डसेट जप्त केले
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ गुन्हे शाखा, युनिट ३ कडील पोलीस अंमलदार हे वारजे माळवाडी व उत्तमनगर पोलीस ठाणे हद्दित अवैध धंदयावर कारवाई करणेकरीता पेट्रोलींगकरीत असताना युनिट ३ कडील पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की, विधीसंघर्षीत बालकाकडे चोरीची दुचाकी व चोरीचे मोबाईल हॅन्डसेट असून तो विक्रीकरीता आला असल्याची माहिती मिळाली. सदर विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेवून त्याचेकडून ०१ सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड व ०७ मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. नमुद विधीसंघर्षीत बालकास विश्वासात घेवून केले तपासात त्याने आणखी एक केटिएम आर सी १५ ही दुचाकी चोरी केली असल्याचे सांगीतल्याने ती त्याचेकडून हस्तगत करण्यात आलेली आहे. नमुद मिळून आलेल्या दुचाकी व मोबाईल हॅन्डसेटबाबत तपास करता सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेडबाबत चिखली पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय गुन्हा रजि. नंबर ५०३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे तसेच केटिएम आर सी १५ बाबत सिहगड रोड पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नंबर १२५/२०२४ भादंविक ३७९ तसेच मिळाले मोबाईल हॅन्डसेटपैकी एक मोबाईल हॅन्डसेट हे उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि. नंबर १११/२०२४ भादंविक ३८० प्रमाणे असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. उर्वरीत मोबाईल हॅन्डसेटबाबत तपास सुरू आहे. त्याचेकडुन एकुण १,६०,०००/-रु. किमतीचा माल जप्त केला आहे. सदरची कामगिरी ही सदरची कामगिरी, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे पुणे शहर. निखिल पिगळे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १. श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, फौजदार महेश कोकाटे तसेच पोलीस अंमलदार शरद वाकसे, सजिव कळंबे, केदार आढाव, गणेश सुतार, विनोद जाधव, सोनम नेवसे, सुजित पवार पोलीस अंमलदार प्रतिक मोरे, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिदे, हरिश गायकवाड, राकेश टेकावडे, इसाक पठाण यांनी केली आहे.