पुणे -सुमारे १२ लाखाचे अंमली पदार्थ जप्त करुन दोघांना पकडून भारती विद्यापीठ पोलीसांनी त्यांना अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ३१/०८/२०२४ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांचे बातमीवरुन नवले पुलाकडुन कात्रजकडे जाणा-या हायवेवरील राजमाता उदयान समोरील रोडवर मल्लीनाथ बसवराज गौडगाव, वय २९ वर्षे, रा. चंद्रभागानगर, भोसले यांचे बिल्डींगमध्ये आंबेगाव बु, पुणे मुळ जि. सोलापुर आणि नौशाद अब्दुलअली शेख, वय ३६ वर्षे, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर हे त्यांचे ताब्यात एकुण ११,९०,२००/-रुपयांचा माल त्यामध्ये २,४५,४००/- रुपयांचे १२ ग्रॅम २७ मिलीग्रॅम वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) व ८,४४,८००/- रुपयांचे ४२ ग्रॅम २४ मिलीग्रॅम वजनाची पांढरट रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्रॉन (एम.डी.) असा एकुण ५४ ग्रॅम ५१ मिलीग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले आहे. म्हणुन त्यांचेविरुध्द पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी सरकारतर्फे दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि नंबर ७१६/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (क), २९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यामध्ये दोघांनाही अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपींकडे मेफेड्रॉन (एम.डी.) हा माल कोठुन आणला आहे याचा तपास करता त्याने सदरचा माल छत्रपती संभाजीनगर येथून आणला असुन सदर आरोपी याचा शोध चालु आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील,
मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सतिश मोरे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमाले, यांच्या पथकाने केली आहे.