मुंबई- पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी आज ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेऊन मनोभावे पूजन केले.
राज्यात गणेश उत्सवाला आज सुरुवात झाली पहिल्याच दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींनी सहपरिवार येऊन लाल बाग बरोबर लालबागमधील चिंचपोकळीच्या चिंतामणी गणरायाचे आणि लालबाग गणेशगल्लीतील ‘मुंबईचा राजा’चे दर्शन घेतले .
शिवसेना नेते स्व. मनोहर जोशी ह्यांच्या घरच्या गणरायाचे या परिवाराने दर्शन घेऊन जोशींच्या घरच्या व्यक्तींची विचारपूस केली.