पुणे-बिहार मधून पुण्यात येऊन रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना गर्दीमुळे मिळत नसलेले तिकिट अाॅनलाइन मध्ये हमखास काढून देताे असे सांगत. त्यानंतर संबंधित प्रवाशास भेटून त्याला निर्जन जागी घेऊन जात त्याला लुटमार करणाऱ्या टाेळीला फरारसखाना पाेलीसांनी अटक केली अाहे. एकूण दहा अाराेपींना पाेलीसांनी अटक करुन त्यांच्या ताब्यातून ४१ माेबाईल फाेन, एक लाख ४३ हजार रुपयांची रक्कम, नऊ एटीएम कार्ड, दाेन पॅनकार्ड, तीन अाधारकार्ड असा एकूण पाच लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
राजा युनुष पिंकु, वय १९ वर्षे, रा. राज्य बिहार, मोहम्मद सुलतान मोहम्मद तौहिद शेख, वय १८ वर्षे,राज्य बिहार, मुन्ना जोधन साह, वय ४१ वर्षे, रा. (मुख्य सुत्रधार) ,राकेश कपलेश्वर पासवान, वय ३२ वर्षे, , बिशम्बर मोसफिर दास वय २५ वर्षे,, धर्मेन्द्रकुमार असरफिया साह वय २८ वर्षे,, जितेन्द्रकुमार मोहन सहनी वय २६ वर्षे, , राजेद्रकुमार सुखदेव महतो, वय २८ वर्षे, ९) दिनेश हरी पासवान वय २७ वर्षे, , पिताम्बर मोसाफिर दास वय २९ वर्षे, सर्व मुळ रा. बिहार अशी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहे.
याबाबत तक्रार दाखल केलेल्या २१ वर्षीय तक्रारदार यांच्या वडीलांचा मुळ गावी बिहार मध्ये अपघात झाला हाेता, त्यामुळे ते पुणे रेल्वे स्टेशनला २५ अाॅगस्ट राेजी गेले हाेते. त्यावेळी रेल्वे तिकिट काऊंटरवर गर्दी असल्याने त्यांना तिकिट मिळत नव्हते. अाराेपी त्यांना भेटले व त्यांनी अाॅनलाईन तिकिट काढून देताे असे सांगत त्यांना डुल्या मारुती मंदिराजवळ घेऊन अाले. त्याठिकाणी निर्जन जागी नेऊन त्यांना मारहाण करुन त्यांचा माेबाईल फाेन, अाधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, पाकीट घेऊन अाराेपी पसार झाले. मात्र, त्यापूर्वी त्यांनी बँक एटीएम कार्डचा पीन जबरदस्तीने घेऊन दाेन दिवसांनी तरुणाच्या खात्यातून परस्पर तीन लाख तीन हजार रुपये काढून घेतले हाेते. याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर, पाेलीसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
पाेलीस अंमलदार गजानन साेनुने व महेश राठाेड यांना माहिती मिळाली की, काही परप्रांतीय अाराेपी गुन्हा करण्यासाठी डुल्या मारुती मंदिर परिसरात येणार अाहे. त्यानुसार पाेलीसांनी सापळा रचून अाराेपी माेहम्मद शेख व राजा पिंकु यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखाेल चाैकशी केल्यावर त्यांचे अाणखी अाठ साथीदार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना देखील पाेलीसांनी अटक केली. त्यांच्या चाैकशी दरम्यान, संबंधित टाेळी मुळची बिहारची असून ते दहीहंडी, गणेशाेत्सव काळात पुण्यात रहाण्यास येतात. पुणे रेल्वे स्टेशन येथून परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांना अाॅनलाईन तिकिट काढून देण्याचा बहाणा करुन त्यांना निर्जन स्थळी नेऊन मारहाण करुन लुटमार करत हाेते. तसेच पाेलीसांनी काेणताही पुरावा मिळू नये याकरिता अाराेपी अाधारकार्ड, एटीएम कार्ड फेकून देत तसेच अंगावरील कपडे देखील विल्हेवाट लावून जात हाेते.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल, सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पो. नि. (गुन्हे) अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पो.उप निरी अरविंद शिंदे, सहा. पो. फौ. मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार तानाजी नागरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, गजानन सोनुने, नितीन जाधव, संदिप कांबळे, समिर माळवदकर, सुमित खुट्टे, अर्जुन कुडाळकर, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर, यांनी केलेली आहे.
आरोपी यांची गुन्हा करण्याची पध्दत सर्व आरोपी हे मुळ बिहार राज्य येथील रहिवासी असुन, ते दहिहंडी व गणेश उत्सव दरम्यान पुणे येथे येतात, आणि रेल्वे स्टेशन येथे थांबुन, परगावी जाणा-या लोकांना ऑनलाईन तिकीट काढुन देण्याचा बहाना करुन, त्यांना निर्जन स्थळी घेवुन जावुन, इतर साथीदाराचे मदतीने जबदरस्तीने मारहाण करुन, ए.टी.एम, पॅनकार्ड, आधार कार्ड हिसकावुन घेवुन जाणे व नंतर वेग-वेगळ्या माध्यमातुन कार्ड स्वॅप करुन त्याव्दारे पैसे काढुन घेणे. तसेच पोलीसांना काहीएक सुगावा लागु नये त्यासाठी अंगावरील कपडे तसेच आधार कार्ड, ए.टी.एम. कार्ड फेकुन पुरावा नष्ट करणे तसेच अंगावरील कपडे देखील विल्हेवाट लावून जात हाेते.