नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम
पुणे-कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित श्रावण महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात महिलांनी गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.
श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी; या उद्देशाने नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मधील महेश विद्यालयात श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी तयार केलेल्या वस्तू; तसेच गौरी-गणपती सजावटीच्या सामानासह, गृहोपयोगी वस्तू यांचे १६० स्टॉल लावण्यात आले होते. या महोत्सवात महिलांनी खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे या महोत्सवात सहभागी महिलांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिल्याने महिलांमध्ये ही उत्साहाचे वातावरण होते.
महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवी. त्यांना उद्योजिका होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. तसेच बचतीच्या माध्यमातून कुटुंबात आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले, असल्याची भावना यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
या महोत्सवाच्या आयोजनात भाजपाच्या माजी नगरसेविका शशिकला मेंगडे, विनिता काळे, भाजपा दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला पुनर्निर्माण सोशल फौंडेशनचे राजेश राठोड, निलेश अलाटे, समुत्कर्ष फौंडेशनचे धनंजय रसाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.