कल्याण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर 10 दिवसानंतर बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली. कल्याणच्या घरी कुटुंबीयांना भेटण्यास आला असता पोलिसांनी अटक केली.
मालवणमधील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवण्याचे कंत्राट जयदीप आपटेकडे होते. 26 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट येथे उभारलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन केल्यानंतर केवळ 8 महिन्यांत 26 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा कोसळला होता.
पुतळ्याचे काम निकृष्ट झाल्याची टीका सुरु झाली. जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोषही निर्माण झाला. त्यामुळे शिल्पकार जयदीप आपटे (कल्याण) व बांधकाम सल्लागार चेतन पाटील (कोल्हापूर) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार दिवसांपूर्वी पाटील कोल्हापुरातून अटक झाली तर तर आपटेचा शोध सुरू होता. आठ दिवस झाले तरी तो सापडत नसल्याने पोलिसांनी लूट आऊट नोटीस जारी केली होती. अखेर बुधवारी तो कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी आला असता त्याला अटक करण्यात आली.
आज कोर्टात हजर करणार
सरकार जयदीप आपटेला लपवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.