- भारतीयांनी जगात सर्वच क्षेत्रात मोठ नाव केलं आहे – डॉ.नीलम गोऱ्हे
- महायुतीच्या वतीने पुण्यात रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन
पुणे – महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता महायुतीच्या वतीने पुण्यात आज रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, दहावी बारावी आयटीआय पदविका व पदवी प्राप्त उमेदवाराच्या तिथेच मुलाखती घेऊन रोजगाराच्या संधी व तसेच शासनाच्या विविध विभागांच्या स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. यावेळी विविध मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले.
याप्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा कार्यक्रमात सत्कार मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सचिव श्रीमती.निवेदिता एकबोटे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाइन शुभेच्छा देश दिला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून आपले मनोगत कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमात बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी 27 कंपन्या या कार्यक्रमात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आल्या आहेत अशी माहिती दिली. तसेच यावेळी उपस्थित मुलांना या कंपन्यांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी मोहोळ यांनी केले.
चांगल्या कौशल्य शिवाय चांगला पगार मिळणार नाही असे प्रतिपादन यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
तसेच यावेळी ज्या देशात विद्यार्थ्यांना जायचं आहे अशा देशातील भाषा विद्यार्थ्यांनी शिकली पाहिजे, असे यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यामध्ये तरुणांना संधी मिळावी यासाठी चंद्रकांतदादा पाटील आणि दीपक केसरकर साहेब यांनी एक टास्क फॉर्स निर्माण करून त्यामध्ये विद्यार्थ्यांना आणि काही संस्थांना सामावून घेतलं पाहिजे. असे यावेळी बोलताना डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
भारतीय लोक जगात जाऊन मोठ्या प्रमाणात नाव करतात,आज अनेक देशांचे पंतप्रधान,सिनेट, प्राध्यापक लेखक हे भारतीय आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन राजेश पांडे, किरण साळी, सुशील मेंगडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला विविध मान्यवर अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.