महिलांना घरातून गुन्हा नोंदवता येणार,महिलांसाठीच्या योजना वाढवणार,राज्य सरकारकडून महिला सशक्तीकरणाचे काम
जळगाव-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखपती दिदी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता महिलांना घरात बसून एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे कडक करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावमध्ये मला महिलांचा महासागर दिसत आहे. बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या माझ्या महाराष्ट्रातील बहिनींना मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्राचे संस्कार हे विश्वभरात पसरले आहेत. पोलंडमध्ये मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्टियन लोकांचा सन्मान करतात. पोलंडमधील अनेक माता बहिणींना कोल्हापुरातील राज घराण्याने आश्रय दिला. जळगाव ही संत मुक्ताईची भूमी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता महिलांना घरुण एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कडक कायदे करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता हे सर्व ट्रेलर आहे, यापुढे आम्ही महिलांसाठीच्या योजना वाढवणार आहोत. ग्रामीण भागातील महिला उत्पन्न वाढीसह देश मजबूत करत आहेत. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देत आहोत, यातून नवीन विचार पुढे येईल असे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी मुलींसाठी बंदी असलेले क्षेत्र आम्ही आता सुरू करत आहोत. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठे बजेट ठेवलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला सर्व महिलांमध्ये राजमाता जिजाऊंची आणि सावित्रीबाई फुलेंची छाप दिसत आहे. 2 महिन्यात 11 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. मोदी सरकारने महिलांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आधीच्या सरकारचे 70 वर्षे एका तराजूत ठेचा आणि माझ्या सरकाच्या काळातील कामे एका आमच्या इतकी महिलांची कामे कुणी केली नाहीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. महिलांना पहिले लोन मिळत नव्हते, पण आता तशी परिस्थिती नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांना लोन देऊ नका असे अनेक जण सांगत होते की दिलेले पैसे डूबतील, पण मला माझ्या आई- बहिणीवर विश्वास आहे. त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. आता आम्ही 20 लाखापर्यंम मुद्रा लोन देणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संपूर्ण टीम ही महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील आहेत, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. 2014 पर्यंत देशात 25000 करोड रुपये लोन सखी मंडळांना लोन मिळाले होते. पण आमच्या सरकारच्या काळात 9 लाख करोड रुपयांची मदत देशातील जनतेला देण्यात आली आहे. सरकार जी मदत देते त्यांत 30 टक्के वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार- अजित पवार
अजित पवार म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वातील विकासाचा रथ जळगावात आला आहे. मी आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात एवढ्या प्रचंड संख्येने महिलांनी महाराष्ट्रात पंतप्रधानांचं स्वागत केल्याचे पाहिले नव्हते. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. देशातील 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार आहे.
2029 पासून देशाचा कारभार महिलांकडे देणार- फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात. महिला अर्थव्यवस्थेचा मुख्य धारेत आल्या तरच विकास होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचा कारभार 2029 पासून महिलांकडे देणार आहेत. महाराष्ट्रातील 75 लाख परिवार हे बचत गटापासून जोडले आहे. 2 कोटी जनतेला बचत गटाशी जोडण्याचा मानस त्यांनी बाेलून दाखवला. तर मोदींच्या नेतृत्वात महिलांचा विकास सुरू आहे, असे म्हणत भारताला विकसित भारत करायचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी- सीएम शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी झाल्या आहेत. जळगाव ही सोन्याची भूमी असून माझ्या बहिणी सोन्यापेक्षा सरस आहे. आमच्या सरकारकडून महिलांना 3 सिलिंडर मोफत देण्यात येत आहे. मोदींच्या काळात 10 कोटी महिला स्वावलंबी झाल्या आहेत.