पुणे:
कै.कमला सुब्रमण्यम यांनी लिहिलेल्या ‘श्रीमद भागवतम् ‘ या मूळ इंग्रजी ग्रंथाच्या शैला पटवर्धन यांनी केलेल्या मराठी अनुवादाचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे आणि अनुवादक शैला पटवर्धन यांच्या हस्ते झाले.भारतीय विद्या भवन,सेनापती बापट रस्ता येथे रविवारी सकाळी हा कार्यक्रम झाला.भारतीय विद्या भवन,पुणे केंद्राच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
डॉ.सदानंद मोरे म्हणाले,’ पुराणांचा भारतीय मनांवर खोल परिणाम आहे .कृष्णाचा उल्लेख पद्म पुराणात, भागवत पुराणात येतो .श्रीकृष्ण चरित्र हे भागवत पुराणात सविस्तरपणे येते. कृष्ण हा रसिक,अष्टपैलू,मुत्सदी आणि नर्तक होता . कृष्ण अवतारात १६ कला प्रगट झाल्या आहेत. म्हणून तो पूर्ण पुरुष होता .महाभारतातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश गीता म्हणून प्रसिद्ध आहे .वारकरी परंपरा ही कृष्णाची परंपरा मानली जाते . कृष्णाने अर्जुनाला जसा उपदेश केलेला आहे,तसा उध्दवालाही केलेला आहे.त्यामुळे भग्वदगीता बरोबर उद्धव गीताही महत्वाची आहे .महाराष्ट्रात गीतेवर लिहिण्याची अखंड परंपरा आहे . ज्ञानेश्वर,दासोपंत , वामन पंडित,विनोबा भावे अशी ही परंपरा आहे .त्यामानाने भागवताकडे महाराष्ट्रात दुर्लक्ष झाले.एकनाथ महाराजांनंतर फार लिखाण झाले नाही .उत्तरेत भागवतावर भर देण्यात आला.अलिकडच्या काळात झालेला भागवत अनुवाद हा शैला पटवर्धनांचा अनुवाद आहे,असे म्हणावे लागेल.मराठी वाचकाला या अनुवादाचा उपयोग होईल .परंपरेवर प्रेम करणाऱ्या वाचकासाठी हा अनुवाद उपयुक्त ठरेल’.भारतीय विद्या भवनच्या परंपरेला अनुरूप असा हा पुस्तकाचा विषय असल्याने प्रकाशनासाठी ते निवडले गेले.वैचारिक भागवत परंपरेच्या अभ्यासासाठी ते संग्राह्य ठरेल’,असे प्रतिपादन प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी केले.
लेखिका शैला पटवर्धन यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.खा.कुमार केतकर ,सुधाकर जोशी ,शुभदा जोशी, श्याम भुर्के,कुमार साठे आदी मान्यवर तसेच पटवर्धन कुटुंबीय उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातातील मृतांना श्रद्धाजंली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावमध्ये मला महिलांचा महासागर दिसत आहे. बचत गटासोबत जोडल्या गेलेल्या माझ्या महाराष्ट्रातील बहिनींना मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्राचे संस्कार हे विश्वभरात पसरले आहेत. पोलंडमध्ये मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्टियन लोकांचा सन्मान करतात. पोलंडमधील अनेक माता बहिणींना कोल्हापुरातील राज घराण्याने आश्रय दिला. जळगाव ही संत मुक्ताईची भूमी आहे.
महिलांना घरातून गुन्हा नोंदवता येणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता महिलांना घरुण एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कडक कायदे करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
महिलांसाठीच्या योजना वाढवणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता हे सर्व ट्रेलर आहे, यापुढे आम्ही महिलांसाठीच्या योजना वाढवणार आहोत. ग्रामीण भागातील महिला उत्पन्न वाढीसह देश मजबूत करत आहेत. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देत आहोत, यातून नवीन विचार पुढे येईल असे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी मुलींसाठी बंदी असलेले क्षेत्र आम्ही आता सुरू करत आहोत. केंद्र सरकारच्या बजेटमध्ये महिलांसाठी मोठे बजेट ठेवलेले आहे.
महिलांमध्ये राजमाता जिजाऊंची छाप दिसते
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मला सर्व महिलांमध्ये राजमाता जिजाऊंची आणि सावित्रीबाई फुलेंची छाप दिसत आहे. 2 महिन्यात 11 लाख लखपती दिदी झाल्या आहेत. मोदी सरकारने महिलांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आधीच्या सरकारचे 70 वर्षे एका तराजूत ठेचा आणि माझ्या सरकाच्या काळातील कामे एका आमच्या इतकी महिलांची कामे कुणी केली नाहीत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. महिलांना पहिले लोन मिळत नव्हते, पण आता तशी परिस्थिती नाही.
मला माझ्या आई- बहिणीवर विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांना लोन देऊ नका असे अनेक जण सांगत होते की दिलेले पैसे डूबतील, पण मला माझ्या आई- बहिणीवर विश्वास आहे. त्यांच्यात काम करण्याची क्षमता आहे. आता आम्ही 20 लाखापर्यंम मुद्रा लोन देणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
राज्य सरकारकडून महिला सशक्तीकरणाचे काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संपूर्ण टीम ही महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील आहेत, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे. 2014 पर्यंत देशात 25000 करोड रुपये लोन सखी मंडळांना लोन मिळाले होते. पण आमच्या सरकारच्या काळात 9 लाख करोड रुपयांची मदत देशातील जनतेला देण्यात आली आहे. सरकार जी मदत देते त्यांत 30 टक्के वाढ करण्यात आली आहे.