पुणे:
हडपसरच्या श्रीराम चौकात,पुण्याचे खास आकर्षण असलेल्या, ‘धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसरमधील शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणारा हा दहिहंडी महोत्सव, कोणत्याही सेलीब्रेटीच्या उपस्थितीशिवाय सर्वात जास्त गर्दी होणारा पुण्यातील दहिहंडी महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. या दहिहंडी महोत्सवात विजेत्या संघाला ७ लक्ष १७,हजार १७१ रूपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. दरवर्षी थरांचे विक्रम करणारा दहिहंडी महोत्सव म्हणून ही धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे. सुसज्य ढोलपथक, उत्कृष्ट डॉल्बी साउंड यंत्रणा, राज्यभरातून येणारे गोविंदा पथक यासाठी हा धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे.
या दहिहंडीला केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक या मंत्रालयाचे राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील, विधानपरीषद उपसभापती शिवसेना नेत्या डॉ.निलमताई गोऱ्हे ,विधानपरीषद आमदार योगेश टिळेकर,आदिंसह महायुतीचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.नागरिकांनी या दहिहंडीला उपस्थित राहुन, गोपालांचा उत्साह वाढवावा,असे आवाहन आयोजक शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी केले आहे.