पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. शहरातील विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी राघवेंद्र उर्फ बाप्पू दीपक मानकर यांना संधी देण्यात आली आहे तर वारजे-कर्वेनगरमध्ये मंजुश्री संदीप खर्डेकर यांना संधी देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका येत्या २१ एप्रिल रोजी होत असून, त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध नगरसेवकांचे शिफारस अर्ज नगरसचिव योगिता भोसले-निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी भाजपा पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक धीरज घाटे, सभागृह नेते गणेशराव बिडकर उपस्थित होते.
यावेळी नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयासाठी श्री. अनिल दिलीप सातव, येरवडा-वडगाव शेरीसाठी सौ. कविता महेंद्र गलांडे, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोडसाठी सौ. अमृता राम म्हेत्रे, औंध-बाणेरसाठी सौ. रोहिणी सुधीर चिमटे, कोथरूड-बावधनसाठी सौ. वासंती नवनाथ जाधव, वारजे-कर्वेनगरसाठी सौ. मंजुश्री संदीप खर्डेकर, सिंहगड रोडसाठी श्री. सचिन रावसाहेब मोरे, धनकवडी-कात्रज-आंबेगावसाठी सौ. प्रतिभा रोहिदास चोरगे, कोंढवा-उंड्रीसाठी सौ. रंजना पुंडलिक टिळेकर, हडपसर-मांजरीसाठी श्री. प्रशांत (मामा) तुपे, बिबवेवाडीसाठी सौ. मनीषा प्रवीण चोरबेले, कसबा पेठसाठी सौ. उज्वला गणेश यादव तसेच विश्रामबागवाड्यासाठी श्री. राघवेंद्र दीपक मानकर यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून खालील नगरसेवकांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे
१)नगर रोड वाघोली क्षेत्रीय कार्यालय – श्री अनिल दिलीप सातव
२) येरवडा वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती कविता महेंद्र गलांडे
३) ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अप गट)
४) छत्रपती शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती अमृता राम म्हेत्रे
५) औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय- श्रीमती रोहिणी सुधीर चिमटे
६) कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय – श्रीमती वासंती नवनाथ जाधव
७) वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती मंजुश्री संदीप खर्डेकर
८) सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय – श्री सचिन रावसाहेब मोरे
९) धनकवडी कात्रज आंबेगाव क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती प्रतिभा रोहिदास चोरगे
१०) कोंढवा उंड्री क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती रंजना पुंडलिक टिळेकर
११) हडपसर मांजरी क्षेत्रीय कार्यालय – श्री प्रशांत उर्फ मामा तुपे
१२) वानवडी क्षेत्रीय कार्यालय –
१३) बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती मनीषा प्रवीण चोरबोले
१४) कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती उज्वला गणेश यादव
१५) विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय – श्री राघवेंद्र दीपक मानकर

