रिव्हर फ्रंट, रोपवे, काचेचा पूल प्रकल्पांची स्थायी समिती अध्यक्षांकडून पाहाणी

Date:

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : महानगरपालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आज स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.शहराच्या पर्यटनवृद्धी, सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देणाऱ्या या प्रकल्पांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

सकाळी सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात प्रस्तावित काचेच्या पुलाबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे तसेच प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे उपस्थित होते. मंदिर ट्रस्टींसोबत चर्चा करून प्रकल्पाची सद्यस्थिती, तांत्रिक बाबी आणि पुढील अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर सारसबाग ते पर्वती दरम्यान प्रस्तावित रोप-वे प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित जागेची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे शहरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या नदी सुधारणा प्रकल्पांतर्गत रिव्हर फ्रंट येथील संगमवाडी भागाची पाहणी करण्यात आली. सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर लंडन आयच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या ‘पुणे रिव्हर फ्रंट एक्सपीरियन्स पार्क’ प्रकल्पाबाबतही चर्चा करून पुढील नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आल्या.

यावेळी बोलताना अध्यक्ष भिमाले यांनी सांगितले की, “हे सर्व प्रकल्प पुण्याच्या पर्यटनाला नवी ओळख देणारे ठरणार असून शहराच्या सौंदर्यात आणि नागरिकांच्या सोयी-सुविधांमध्ये मोलाची भर घालतील. पुणे अधिक आधुनिक, आकर्षक आणि गतिमान शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक कामाचा सचिन अहिर यांनी घेतला सविस्तर आढावा

मतदार पुनर्निरीक्षण, बीएलए नियुक्त्या आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

महापालिकेच्या ३५ कोटींच्या थकीत भाडेवसुलीसाठी विशेष मोहीम राबवा

थकबाकीदारांना ३० दिवसांत अंतिम नोटिसा; जाणीवपूर्वक भाडे थकविणाऱ्यांवर कायदेशीर...

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांची सदिच्छा भेट

पुणे.दि.३: महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान उपसभापती सचिन अहिर...

तीन वर्षांच्या हरवलेल्या चिमुकलीचा अवघ्या तासाभरात शोध

३८ पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या पथकाने परिसर पिंजून काढला; कर्वेनगरमधील बिजली...