पुणे- स्टेशन ते आळंदी दरम्यान बस प्रवास करत असलेल्या 16 व 17 वर्षाच्या दोन मुलींना प्रवासा दरम्यान, बस मध्ये चढलेल्या 25 वयोगटातील दोन अनोळखी तरुणांनी छेडछाड काढत, एकीला मिठी मारुन तसेच तिच्या शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करुन विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात आरोपीवर विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी पिडित मुलीच्या ३८ वर्षीय आईने पोलिसांकडे अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची १६ वर्षीय मुलगी ही तिची १७ वर्षीय मैत्रिण साेबत काॅलेज सुटल्यावर बस प्रवास करत हाेती. त्यावेळी बस क्रम, १३५ ही पुणे स्टेशन ते आळंदी दरम्यान जात असताना, बस मध्ये दोन अनोळखी मुले चढली. त्यांनी पिडित मुलीस धक्का देऊन तिच्या शरीरास आक्षेपार्ह स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीस एका आरोपीने कमरेला मिठी मारुन तिचा विनयभंग केला. तर, आणखी एका मैत्रिणीस मिठी मारुन आराेपी नागपूर चाळ बसस्टाॅपवर बस थांबल्यावर उतरले. सदर मुलीने बसमधून उतरुन रस्त्यावरुन उतरुन खालील दगड उचलून घेऊन त्यातील एकाला दगडाने मारला असता, त्या दाेघांनी जाताना आम्ही आमच्या ग्रुपला घेऊन येताे, मग बघताे अशी धमकी देऊन विनयभंग केला. तसेच बस मध्ये महिला कंडक्टरला देखिल आराेपींनी अश्लील शिवीगाळ करुन गाडीत असणाऱ्या वयस्कर व्यक्तीला हाताने मारहाण केली. याबाबत पुढील तपास येरवडा पाेलीस करत आहे.