पुणे-कोलकाता, बदलापूर येथे लैंगिक अत्याचाराच्या घटना बद्दल आक्रोश निर्माण झालेला असतानाच, पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक 16 वर्षीय मुलगी ही नवले ब्रीज ते कात्रज दरम्यान रीक्षाने प्रवास करत असताना, रिक्षाचालकाने तिला कोलकाता येथे झालेल्या प्रकाराप्रमाणे घटना करण्याची धमकी देत तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी मुलीच्या ३७ वर्षीय आईने आरोपी विरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रिक्षाचालक गाेविंद हनुमंत नेनावत (वय-२३,रा. मानाजी नगर, पुणे) याच्यावर भान्यास कलम ७४,७५ पोक्सो कायदा कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची १६ वर्षीय मुलगी 23 ऑगस्ट रोजी पावणेआठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास नवले ब्रीज ते कात्रज यादरम्यान प्रवास करत हाेती. त्यावेळी रिक्षात ती एकटीच असल्याचा गैरफायदा घेून , ती अल्पवयीन असल्याचे दिसत असून सुध्दा आरोपी रिक्षाचालकाने तिला विचारणा केली की, तुला बायफ्रेंड आहे का? असे बाेलत तीचा हात धरला. त्यावेळी मुलीने त्याला काय करताेयस असे बाेलून तिचा धरलेला हात ओढून काढून घेतला. त्यावेळी रिक्षा चालवत असतानाच ताे म्हणाला की, तुला काेलकत्ता येथे काय प्रकार घडलाय माहिती आहे का? त्या मलीची छाती कापली, गुप्तांग मध्ये काहीतरी घातले हाेते असे बाेलून ताे तिला बाेलला की, तु मला खुप आवडतेस, चल आपण लाॅजवर जाऊ असे बाेलून पुन्हा त्याने तीचा हात बळजबरीने धरला. त्यामुळे मुलगी घाबरली गेली व तिच्या मनास लज्जा निर्माण करणारी कृती आराेपीने केली. याप्रकरणी पाेलीस उपनिरीक्षक एस काेळी पुढील तपास करत आहे.