पुणे : वंचित विकास संस्था व दे आसरा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यम सेल अंतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी वंचित विकास केंद्र कार्यालय, नारायण पेठ, पुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे. मागील व्यवसाय कार्यशाळांच्या भरघोस यशानंतर वंचित विकासने महिला सबलीकरणासाठी पुन्हा एकदा व्यवसाय वृद्धी कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
कार्यशाळेत व्यवसायाच्या संधी, व्यवसाय वृद्धी आणि विक्री व्यवस्थापन याबाबत तज्ज्ञांकडून, तर व्यवसायासाठी भांडवल, कर्ज प्रस्ताव व कर्ज पुरवठा याबाबत बँक अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, प्रपोजल बनविणे, प्रोडक्शन फायनान्स, मार्केटिंग, आदी विषय कार्यशाळेमध्ये चर्चिले जाणार आहेत. सहभागासाठी अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी तेजस्विनी थिटे (९८२२००१५०३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.