१२ तास तिरंगा घेऊन ऊभे रहाण्याच्या उपक्रमाची सांगता..!
पिंपरी, पुणे दि १५ ॲागस्ट –
स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांघीं सह पटेल, नेहरू, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस, भगत सिंह – राजगुरू आदींच्या नेतृत्वाखालील ‘ब्रिटीश विरोघी दिर्घ कालीन लढ्या नंतर, शेकडोंच्या हौतात्म्या नंतर ‘स्वातंत्र्योत्तर भारताचा’ ऊदय १५ ॲागस्ट १९४७ साली झाला व जगात ‘प्रजासत्ताक भारताचे’ अस्तित्व निर्माण झाले, हे वास्तव नाकारता येत नाही. १९४७ पासून, जगात भारताचे प्रतिनिधीत्व करत असलेला ‘तिरंगा ध्वज’ हा ‘राष्ट्राभिमान, सार्वभौमत्व व राष्ट्रीय एकात्मते’चे प्रतिक आहे, केवळ बाजारु प्रदर्शन वा मार्केटींगचा विषय नाही असे प्रतिपादन काँग्रेसनेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ‘१२ तास तिरंगा ध्वज हाती धरण्याच्या उपक्रमाच्या’ समारोप प्रसंगी काढले.
पिंपरी_चिंचवड शहर काँग्रेस, डॅाक्टर सेल च्या अध्यक्षा डॅा मनीषा गरूड यांचे पुढाकाराने आयोजित “हात से जुडे हात तिरंगा के साथ” या उपक्रमाचा शुभारंभ पिंपरी – चिंचवड येथील डॅा बाबा साहेब आंबेडकर चौकात सुरक्षारक्षक, सफाई कामगार, विद्यार्थी, पोलीस, माजी सैनिक, राष्ट्रीय सेवादल यांच्या उपस्थितीत वंदे मातरम या गीताने सकाळी ६ वा इंटक कामगार नेते व पिंपरी चिंचवड काँग्रेस अध्यक्ष डॅा कैलास कदम यांचे हस्ते झाला होता.
आपल्या समारोपाच्या भाषणात गोपाळ तिवारी पुढे म्हणाले की, तिरंगा ध्वज हा शौर्य, सामाजिक शांती – सौहार्द, सुरक्षा, समता, समृध्दी व विकासाचे’ प्रतिक आहे.
स्वतंत्र, धर्म निरपेक्ष व आत्मनिर्भर भारताची वाटचाल १९४७ पासुनच सुरू झाली. त्या वेळच्या तुलनेत लोकसंख्या, शिक्षण, साक्षरता, कृषी ऊत्पन्न, क्षेपणास्त्रे, अंतराळ संशोधन, संसाधने व उत्पादन क्षमते मध्ये ७६ वर्षात देशाने प्रगती साधून ‘२०१४ साली देश आर्थिक महासत्ता’ बनू घातला होता, हे वास्तव नाकारू शकत नाही. या प्रगतीमध्ये देशातील राजकीय पक्ष, विविध धर्मिय – राजकीय नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, कलाकार ते खेळाडूं’ पर्यंतचे योगदान लक्षात घेतले तर ‘विविधतेत एकता हीच भारताची विशेषता’ असल्याचे सिध्द होते.
देशाच्या स्वातंत्र्या’साठी प्राणपणाने लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी ‘तिरंगा झेंडा’ हे स्वातंत्र्य प्रेरणे’चे प्रतिक होते व आहे, मात्र स्वातंत्र्य भिकेत मिळाल्याची व खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाल्याची वल्गना करणाऱ्यांना “पदमश्री” बहाल करणाऱ्या आत्म केंद्रीत व अहंकारी सत्ताधाऱ्यांना शिक्षणा अभावी हे कसे कळणार (?) असा उपरोधिक सवाल ही त्यांनी केला.
‘राष्ट्रघ्वज तिरंग्याचा मान हा संविधानिक आचरणातुन व कर्तव्यपुर्तीतुन झाला पाहीजे. संविधानिक पदावरील विरोधीपक्ष नेत्याचा अवमान करून, लोक पसंतीच्या द्वितीय क्रमांकाच्या पक्षाची अवहेलना करून व लोकशाही मुल्ये पायदळी तुडवुन नव्हे… अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.
“हात से जुडे हात तिरंगा के साथ” या उपक्रमात देशाचा अभिमान व शान असलेला ‘तिरंगा ध्वज’ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खाली ठेवायचा नाही’ ही कल्पनाच् भारावून देणारी होती. शहरातील सु दोन हजार नागरिकांनी यात सहभाग नोंदवला. रस्त्यावरून जाणारे नागरिक उत्स्फूर्त भाग घेत होते. दिव्यांग व अंध व्यक्ती, युवा विद्यार्थी, कामगार इ अभिमानाने झेंडा हातात घेत होते.
स ६ ते सायं ६ पर्यंत तिरंगा ध्वज हाती धरण्याच्या उपक्रमात मा. सर्वश्री डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर मनोज राका, सुमंत गरुड, अंबालाल पाटील, डॉ तानाजी बांगर, डॉ सुहास कांबळे, माजी आमदार श्री गौतम चाबुकस्वार, मारुती भापकर, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ ज्योतीताई निंबाळकर, युकाँ चे इमरान खान, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्लेकर, मयूर जयस्वाल, बाबा बनसोडे, जितेंद्र छाबडा, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, ज्येष्ठ नेते अभिमन्यू दहीतुले, निघारताई बारस्कर, बाबा मुकुटमल, माडगूळकर, उमेश खंदारे, संदीप भिरुड, सायली भांबुर्डे, सुजित लोंढे, सुजित पोखरकर, ज्योती भारुड, मोना दिवान, प्रिया दिवाण, नाणेकर,किरण खाजेकर, विशाल सरवदे, विजय ओवाळ, रविभाऊ नांगरे, सुप्रिया पोहरे, निर्मलाताई खैरे, स्मिताताई पवार, जुबेर भाई, मेहबूब भाई, शाबुद्दीन शेख, इरफान खान, राजन नायर, शिबू असेफ, झेवियर अँथोनी, भीमशक्तीचे सुरज गायकवाड, बीबी शिंदे, संदेश नवले, देवेंद्रजी तायडे, बीबी पाटील, धनंजय भिलारे, ॲड स्वप्नील जगताप, गणेश शिंदे इ मविआ पदाधिकारी इ सहीत विविध धर्मिय व पक्षीय नेते, पदाधिकारी, काँग्रेस, सेवादल, युकॅा महीला काँग्रेस पदाधिकारी उत्सुफुर्तपणे सहभागी झाले होते.
डॅा मनीषा गरूड यांनी प्रास्ताविकात या उपक्रमा मागील संकल्पना सांगितली. समारोप प्रसंगी सायं ६ वा. माडगुळकरांनी ‘झेंडा गी’त गाऊन व शेवट राष्ट्रगीत होऊन उपक्रमाची सांगता झाली.
‘तिरंग्या’ची गरीमा व भाव’ आत्मसात करण्याचा विषय.. बाजारू प्रदर्शन, ‘मार्केटींग’चा विषय नव्हे ..!! ⁃ काँग्रेस नेते गोपाळ तिवारी
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/