पुणे- केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेते गणेश बिडकर यांनी पुढाकार घेऊन मोठ्या हिरारीने सुरु केलेल्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात आज चक्क झेंडावंदन झालेच नाही.येथे आज सुट्टीची सामसूम होती. १५ ऑगस्ट निमित्ताने प्रत्येक शाळेत हायस्कूल मध्ये, महाविद्यालयात शासकीय निमशासकीय कार्यालयात झेंडावंदन करण्यात येते तिरंग्याला सलामी दिली जाते.या महाविद्यालयात मात्र असे काहीही झाले नसल्याने नाराजी व्यक्त होते आहे.या संदर्भात माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी तातडीने महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देखील दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे कि,’माझ्या प्रभागातील पुणे महानगरपालिकेचे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज येथे ७८ व्या स्वातंत्र्यदिनी येथील डीन व व्यवस्थापक यांनी झेंडावंदन केलेले नाही असे निदर्शनास आलेले आहे ही बाब अत्यंत गंभीर असून त्याची शहानिशा करून त्वरित कार्यवाही करण्यात यावी याचे तक्रार आलेले फोटो व व्हिडिओ आपणास देत आहोत.
आजच्या दिवसाचे फोटो आणि व्हिडीओ देखील बिडकर यांनी आयुक्तांना दिले आहेत. आता आयुक्त राजेंद्र भोसले यावर काय कारवाई आणि कधी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान महापालिकेच्या मुख्य इमारतीत मात्र आयुक्तांनी महात्मा फुले पुतळ्याला पुष्पहार घालून,छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व्यवस्थित रित्या तीर्नाग्याला सलामी दिली.सर्व अधिकारी वर्ग येथे यावेळी उपस्थित देखील होता.मात्र अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात झेंडावंदन का झाले नाही ? याचे उत्तर मिळू शकलेले नाही.