पुणे: कर्वेनगर येथील कर्वे समाजसेवा संस्थेमध्ये आज देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन भारतीय स्वातंत्र्यावर तसेच नशामुक्त भारत अभियानपर विविध स्पर्धा व उपक्रमांनी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य संदीप दिघे तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्य सौ शिल्पा पाठक व संचालक डॉ. महेश ठाकूर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
संस्थेमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, ध्वजारोहनानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसंग्राम, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास यावर प्रकाशझोत टाकणारी मनोगते व्यक्त केली
कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे श्री संदीप दिघे व सौ शिल्पा पाठक यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन करून यावर्षी भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नशा मुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने तरुणांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन तरुण पिढीला नशा मुक्त करून सशक्त भारताची सशक्त तरुण पिढी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले
अध्यक्षस्थानावरून बोलताना संचालक डॉ महेश ठाकूर यांनी सद्यपरिस्थितीतील समाजातील भयानक वास्तवतेबाबत तसेच स्वातंत्र्याबाबत विविध निरीक्षणे नोंदवित समाजामध्ये सध्या सुरू असलेल्या जातीभेद, भेदाभेद व गटातटातील जनतेच्या विभागणीला फाटा देण्याचे काम समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन केले
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री मधुकर पाठक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विनायक कराळे, उपाध्यक्ष श्री रवी पवार ,सचिव श्री एम शिवकुमार तसेच विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा चेतन दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते
सदर कार्यक्रमा वेळी विद्यार्थ्यांनी नशा मुक्त भारत अभियानासंदर्भात आयोजित भाषण स्पर्धेमध्ये तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून नशा मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून विविध व्यसने व व्यसनांच्या प्रकाराबाबतीत उपस्थितांमध्ये जनजागृती केली, तसेच विद्यार्थ्यांनी यावेळेस गीत गायन तसेच कविता वाचन देखील केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकार्य द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी मानसी तिडके प्रथम वर्षाची विद्यार्थिनी श्रेया परदेशी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी कल्याण विकास अधिकारी प्रा चेतन दिवाण यांनी मांडले
कार्यक्रमास संस्थेचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी समाजकार्य प्रथम,द्वितीय वर्ष आणि बी डी कर्वे महाविद्यालयाचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते