पुणे, दि. १५: भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथे ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी अधिकारी अर्चना तांबे, रेवनाथ लबडे, सिद्धार्थ भंडारे, संगिता राजापूरकर, उप विभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियत्रंण कार्यक्रमांतर्गत तंबाखू मुक्तीबाबत तसेच मतदान जनजागृतीपर शपथ देण्यात आली.