पुणे – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला प्रचंड प्रतिसाद असून ही योजना प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोचवा, अशी आग्रही मागणी माझ्या मतदारसंघातील भगिनी करताहेत. या योजनेवर त्या दाखवित असलेला विश्वास भारावून टाकणारा आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. या योजनेसंदर्भात काल काही भगिनींनी येउन शिरोळे यांची भेट घेतली.
यानंतर ते बोलत होते.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची माहिती देणारे काही फलक शिवाजीनगर मतदारसंघात लावल्यानंतर त्यातील महिलांचे छायाचित्र वापरण्यावर काहींनी आक्षेप घेतले होते. त्यांच्या भावनांचा विचार करून शिरोळे यांनी ते फलक हटवले. हे वृत्त समजताच मतदारसंघातील अनेक भगिनींनी शिरोळे यांची भेट घेतली. या योजनेच्या प्रसारासाठी आमची छायाचित्रे वापरा परंतु प्रत्येक पात्र महिलेपर्यंत ही योजना पोचलीच पाहीजे, अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या शब्दांनी मी भारावून गेलो, असे शिरोळे यांनी सांगितले. गरजू महिलांसाठी मोलाची ठरणारी ही योजना पोचवण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केल्याचे शिरोळे यांनी सांगितले.