पीव्हीपी महाविद्यालयाच्या वतीने १२ वी  आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा

Date:

स्पर्धाविवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन 
पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने ‘आर्किटेक्चरल कोशंट’  आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वास्तुकला विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सोमवार  दिनांक ५  आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता नवी पेठेतील एस.एम. जोशी सभागृहात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदा बारावे वर्ष आहे. 
पुण्यातील आर्किटेक्चरच्या विविध महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. विजेत्या संघासाठी प्रमाणपत्रे आणि १२ हजार रुपये, प्रथम उपविजेत्या संघासाठी ८ हजार रुपये आणि द्वितीय उपविजेत्या संघांना ६ हजार  रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत शेवटच्या तीन संघांसाठी २ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक तसेच प्रश्नमंजुषेत जास्तीत जास्त संघांचा सहभाग असलेल्या महाविद्यालयांसाठी ट्रॉफी देखील देण्यात येणार आहे. 
विवेकानंद इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड,  विश्वस्त आणि सचिव जितेंद्र पितलीया, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, वस्तूकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, प्रा. देवेंद्र देशपांडे – ९४२३५८५२७६, , प्रा. हर्षवर्धन वाकोडे – ९०९६१८६७८८  या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...