पुणे – पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने “आगामी कामगार कायदे” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. भाऊ इन्स्टिट्यूटच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात माजी सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी काकडे, श्रमिक एकता महासंघाचे अॅड. किशोर ढोकळे पाटील, भारतीय मजदूरसंघाचे अनिल ढूमणे, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलतांना संभाजी काकडे यांनी कामगारांचे हित व अपेक्षा आणि मालक- मॅनेजमेंट यांचे हित व अपेक्षा विरुद्ध असतात या दोघांचा या कायद्याने समन्वय करून सुवर्णमध्य काढला पाहिजे असे सांगितले. अनिल ढूमणे यांनी भारतात फक्त ८ टक्के संघटीत कामगार आहेत बाकी असंघटीत आहेत, या दोघांचे हितसंबंध कायद्यात जपले गेले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. किशोर ढोकळे यांनी कायदा काहीही असला तरी यातून पळवाटा काढून कामगारांचे शोषण होते असे सांगितले. प्रदीप तुपे यांनी सर्वांनी एकत्र प्रयत्न करून या विषयावर जनजागृती केली पाहिजे असे सांगितले. या चर्चासत्राला मनुष्यबळ विकास अधिकारी, मॅनेजमेंट अधिकारी, कायदे सल्लागार, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने “आगामी कामगार कायदे”.यावर चर्चासत्र संपन्न.
Date: