ससून रुग्णालय कारभाराच्या निषेधार्थ  पुणे काँग्रेसच्यावतीने अधिष्ठाता यांना निवेदन सादर

Date:

 पुणे-पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज ससून सर्वोपचार रूग्णालय येथील अधिष्ठाता यांना शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.

   अरविंद शिंदे म्हणाले कि,’  ससून रूग्णालय हे गरीब आणि मध्यम वर्गींयासाठी आहे. परंतु दिवसेंदिवस ससून रूग्णालयातून वेगवेगळ्याच बातम्या बाहेर येत आहे. म्हणजे ससूनमध्ये नक्की शिजते तरी काय? ललित पाटील गांजा प्रकरण, उंदीर चावून एका रोग्याचा मृत्यू होणे, गुन्हेगारांना VIP ट्रिटमेंट मिळणे, कल्याणी नगरमधील ब्लड रिपोर्ट बदलण्याचा प्रकार आणि आता चक्क निराधार रूग्णाला निर्जन स्थळी फेकून देण्याचा प्रकार. हे प्रकरण जेव्‍हा आता उघडकीस आल्या नंतर असे वाटते की, गेले कित्येक दिवस कित्येक रूग्णांना हे असेच टाकून येत असतील. खरे तर जे डॉक्टर होतात त्यांना एक शपथ घ्यावी लागते पण हे असे निर्दयी क्रुर डॉक्टर पुजा खेडकर सारखेच पास झाले आहेत का. पुणे शहराच्या आजूबाजूंच्या ६ जिल्ह्यातून गरीब नागरिक उपचारासाठी ससूनमध्ये येतात आणि जर त्यांच्या जीवाशी डॉक्टर खेळत असतील तर ते कदापी आम्ही सहन करणार नाही. माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य ज्या डॉक्टरांनी केले ते अभ्यास करून डॉक्टर झाल्यासारखे वाटत नाही. म्हणून त्यांची डॉक्टर ही पदवी रद्द करण्यासाठी शिफारस करावी. अशा प्रकारची मागणी या निवेदनाद्वारे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून करण्यात आली मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी सांगितले.     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर, लता राजगुरू, संगीता तिवारी, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, सुजाता शेट्टी, शोभना पण्णीकर, सुनिता नेमुर, रजिया बल्लारी, बेबी राऊत, राज अंबिके, रवि पाटोळे, हेमंत राजभोज, फिरोज शेख आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापारेषणच्या यंत्रणेतील बिघाडाचा महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम

बहुतांश भागाचा वीजपुरवठा पूर्ववत पुणे : महापारेषण कंपनीच्या चिंचवड येथील २२० केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात रविवारी (दि. ६) दुपारी सुमारे १२.२५ वाजता तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून, या बिघाडाचा परिणाम महावितरणच्या वीजपुरवठ्यावर झाला. महावितरणने उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून बहुतांश प्रभावित भागाचा वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात यश मिळविले. चिंचवड उपकेंद्रातील २२ केव्ही सीटी व ब्रेकरमध्ये स्फोट होऊन आग लागल्याने महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिन्यांवर परिणाम झाला. परिणामी पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, रावेत, काळेवाडी, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, पुनावळे, ताथवडे आदी भागांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. तसेच शिवाजीनगर, औंध व गणेशखिंड भागातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला. महापारेषणकडून बिघाड झालेला भाग बंद ठेवून उर्वरित यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे, महावितरणकडून उपलब्ध पर्यायी मार्गांचा वापर करून प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात यश मिळाले. शिवाजीनगर परिसरातील वीजपुरवठाही काही काळ खंडित चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या रहाटणी व गणेशखिंड १३२ केव्ही वाहिनीवर परिणाम झाल्याने शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर गावठाण, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी भागांतील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. दुपारी १२.२५ वाजता खंडित झालेला या भागातील वीजपुरवठा सुमारे १.५० वाजता पूर्ववत करण्यात आला. गणेशखिंड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून पुणे मेट्रोलाही वीजपुरवठा होतो. या वीजपुरवठ्यावरही काही काळ परिणाम झाला होता. बाधित ग्राहकसंख्या महापारेषणच्या चिंचवड अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील बिघाडामुळे महावितरणच्या वीजपुरवठ्यावर परिणाम होऊन पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरातील सुमारे २ लाख ६० हजार ग्राहक, तर शिवाजीनगर, औंध, गणेशखिंड, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, बालगंधर्व आदी परिसरातील सुमारे ५० हजार ग्राहक, अशा एकूण सुमारे ३ लाख १० हजार ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. निगडी परिसरातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना विलंब महावितरणने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर देऊन बहुतांश भागातील वीजपुरवठा दुपारी ३ वाजेपर्यंत पूर्ववत केला. मात्र निगडी, यमुनानगर, बिजलीनगर, रावेत, मामुर्डी, देहूरोड, चिंचवड, ताथवडे, वाकड आदी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास काहीसा विलंब होत आहे. या भागातील सुमारे सव्वालाख ग्राहकांना वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. आंबेठाण व तळेगावलाही फटका चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्रातील बिघाडाचा फटका आंबेठाण (चाकण) व तळेगाव १३२ उपकेंद्रांनाही बसला. महावितरणने तळेगाव शहराचा वीजपुरवठा खोपोलीतून पर्यायी लाईनद्वारे पूर्ववत करुन घरगुती ग्राहकांना दिलासा दिला. मात्र औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा तांत्रिक मर्यादा आल्या. तर आंबेठाण उपकेंद्राचा १२.२५ वाजता बंद झालेला वीजपुरवठा दुपारी ४.२० वाजता सुरळीत झाला. अंदाजे दीड हजार उद्योगांना याची झळ बसली. महावितरणकडून प्रभावी नियोजन महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेतील बिघाडामुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवर परिणाम झाला असला, तरी महावितरणने उपलब्ध पर्यायी व्यवस्थेचा प्रभावी वापर करून बहुतांश भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. उर्वरित प्रभावित भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला:डीजेवर बंदी घालणे योग्यच, – मेघना बोर्डीकर

धाराशिव-सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह...

‘डीजेच्या कानठळ्या नको रे बाप्पा…’; बापट-पंडितांच्या समर्थनार्थ पुणेकर रस्त्यावर

बालगंधर्व ते महापालिका नागरिकांचा मोर्चा; ‘नागपुरात एक नियम आणि...

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकर रस्त्यावर; विद्यानंद बापटांच्या, संतोष पंडितांच्या भूमिकेला मोर्चातून समर्थन

बालगंधर्व चौकातून महापालिकेवर मोर्चा; ‘सण कोणताही असो, कर्णकर्कश डीजे...