पुणे-उंड्री परिसरात ईरा एज्युकेशन साेसायटी पुणे संचालित ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल सुरु करुन पहिली ते दहावी इयत्ता पर्यंतचे अनाधिकृत वर्ग चालू करुन, विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन शासनासह, पालक व विद्यार्थ्यांची फसवणुक केल्याने संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापक यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबत काेंढवा पाेलिस ठाण्यात ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष जे. डिकाेस्टा (रा.बंगळुरु), संचालक समीर गाेरडे (रा.विमाननगर,पुणे) व मुख्याध्यापिका अनिता नायर यांच्यावर काेंढवा पाेलिस ठाण्यात भान्यास कलम ३१८ (४), ३३६(२), ३३६ (३) व ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी यांनी संगनमत करुन ऊंड्री भागात ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल सुरु केले हाेते.
पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन अनाधिकृत वर्ग सुरु केले. अधिकृत वर्ग चालु करण्यासाठी शासनाची काेणतीही परवानगी किंवा मान्यता न घेता बेकायदेशीररित्या शाळा चालवत असल्याचे दिसून आले. पालकांकडून अनाधिकृतपणे फी वसुल करुन विद्यार्थी व पालकांची फसवणुक करण्यात आली. सदरील शाळा अनाधिकृत असुन सुध्दा इतर शाळांना दाखला मागणी करणे, विद्यार्थ्यांचे दाखले देणे, विद्यार्थ्यांचे मुळ जन्मप्रमाणपत्र अनाधिकृतरित्या ताब्यात घेणे, अनाधिकृतरित्या जनरल रजिस्टर क्रमांक एक मध्ये नाव नाेंदणी करणे, विद्यार्थी उपस्थिती पत्रक बनवणे, शाळेला शासन मान्यता नसताना देखील ती असल्याचे भासवणे आदी बाबी शाळेने केल्या आहे. सदरची शाळा अनाधिकृत सुरुऑअसल्याने शासनास आवश्यक असलेला महसुल बुडून शासनाची फसवणुक केली आहे. याबाबत पुढील तपास काेंढवा पाेलीस करत आहेत.