पुणे-भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या अधिवेशनासाठी पुण्यनगरीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह काल रात्री उशिरा दाखल झाले . यावेळी पुणे विमानतळावर त्यांचे स्वागत स्थानिक नेत्यांनी केले . यावेळी राज्याचे मंत्री कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
आज २१ जुलै रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून त्यात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख पक्की करणार आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी पुण्यात दाखल झाल्याची माहिती प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली.महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे.असेही खर्डेकर म्हणाले.
बालेवाडी येथे होणाऱ्या अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका (हिंदीतील) पुढील प्रमाणे आहे..
सुबह 09.00 ते 10.00 • पंजीकरण 10.00 ते 11.00 अल्प-उपहार 11.00 मान्यवरोंका आगमन 11.05 उद्घाटन सत्र 11.10 ध्वजवंदन 11.15 सभागृह में आगमन दीपप्रज्वलन / प्रतिमापूजन • वंदेमातरम् – महाराष्ट्र गीत 11.20 मान्यवरोंका स्वागत 11.30 स्थानिक अध्यक्ष की ओर से उपस्थितीओंका स्वागत 11.35 शोकप्रस्ताव 11.40 ते 12.00 मा. चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश अध्यक्ष (अध्यक्षीय प्रास्ताविक) दोपहर 12.00 ते 12.30 मा. रावसाहब दानवे पाटील, पूर्व केंद्रीय राज्यमंत्री राजकीय ठराव मा. पंतप्रधान मोदी जी आणि महाराष्ट्र सरकार यांचे अभिनंदन 12.30 ते 01.00 मा. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री (उद्घाटनपर सत्र समारोप) 01.00 ते 02.00 भोजन 02.00 ते 02.10 समारोप सत्र • नवनियुक्त सांसद एवं विधायकों का अभिनंदन 02.10 ते 02.20 मा. शिवप्रकाश जी, राष्ट्रीय सहसंगठनमंत्री 02.20 ते 02.50 मा. देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री 02.50 मा. अमित जी शाह, केंद्रीय गृहमंत्री आभार