Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल:एका कुटुंबातील दोन महिलांना मिळणार लाभ

Date:

…तर सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द-सेतू केंद्र कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकेला 50 रुपये-एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ

मुंबई- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अडीच लाख रुपयांपर्यंतच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळणार आहेत. यामध्ये पाच एकर जमिनीची अट टाकण्यात आली होती. ती अट देखील आता रद्द करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.

एक जुलैपासून ही योजना लागू झाली असून योजनेत अर्ज करण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या साठी दिवसाच्या कालावधीत ज्या महिला अर्ज करतील, त्या महिलांनी एक जुलैला अर्ज केला आहे असे समजून दोन्ही महिन्याचे पेमेंट मिळणार आहे. तर ऑगस्ट महिन्यानंतर ज्या महिला अर्ज करतील, त्यांनी अर्ज केलेल्या दिनांक पासून त्यांना पैसे मिळतील. अशा प्रकारच्या निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

डोमिसाईलचा दाखला हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तरी या संदर्भात त्या महिलेच्या पतीकडे जर राज्यातील जन्माचा दाखला असेल तर ते देखील या योजनेसाठी चालणार आहे. किंवा पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे रेशन कार्ड किंवा निवडणुकीत मतदान यादी मध्ये त्यांचे नाव असेल तर ते देखील चालणार आहे. ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे, त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखल देण्याची अट काढून टाकण्यात आली असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एकाही महिलेने एजंटच्या नादी लागू नये. एजंट येत असेल तर त्याची तक्रार करा, अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांने गडबड करण्याचा प्रयत्न केला. त्याला निलंबित करण्यात आले असून त्याला बडतर्फ करण्याचा विचार देखील राज्य सरकार करत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. इतकेच नाही तर सेतू केंद्र आणि अंगणवाडी सेविकांनी या योजनेमध्ये मदत करावी यासाठी त्यांना देखील प्रति अर्ज पन्नास रुपये राज्य सरकार देणार असल्याची महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

या व्यतिरिक्त ज्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा तसा पुरावा मिळेल. त्या सेतू सुविधा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, असा कडक इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या योजनेचे काम ऑफलाइन आणि ऑनलाईन देखील करण्यात आले आहे. ऑनलाइन मुळे एकाच दिवशी अनेक लाभार्थी अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असतात. मात्र हळूहळू अडचणी देखील दूर करण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ देण्यात येणार आहे. यातील एक विवाहित असेल आणि दुसरी अविवाहित असेल तरी देखील योजनेचा लाभ घेता येईल, असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या प्रश्नाचे उत्तर देखील या माध्यमातून मिळाले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा -भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

पुणे -आज पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाताना इंटरनेटच्या...

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...