उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये भोले बाबांच्या सत्संग सुरू असताना मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक भाविक जखमी झाले. यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.
सीएमओ उमेश त्रिपाठी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जखमींना बसमध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक पोलिस ठाण्यांतून फौजफाटाही मागवण्यात आला आहे.
सत्संग संपला त्यानंतर लोक एकत्र निघून जात होते. हॉल छोटा होता. गेटही छोटे होते. आधी बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर तुटून पडले. बहुतेक महिला आणि मुले होती. त्यामुळे दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.