चिंचवड मध्ये शिंदे सरकारचे अभिनंदन व शिवसेनेचा आनंद उत्सव
पिंपरी, पुणे (दि. ०२ जुलै २०२४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने महिलांचा सन्मान वाढवत ‘लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ तळागाळातील महिलांना वेळेत मिळावा यासाठी एक खिडकी योजना सुरू करावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्फत आपण करणार आहोत असे शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस यांनी सांगितले.
शिंदे सरकारने एक जुलैपासून राज्यातील गरीब महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. यामध्ये महिलांना महिन्याला दीड हजार रुपये अनुदान व वर्षात तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या निमित्त शिंदे सरकारचे अभिनंदन करीत चापेकर चौक, चिंचवड येथे शिवसेनेच्या वतीने पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना जिल्हा महिला प्रमुख शैलजा पाचपुते, उपजिल्हा प्रमुख राजेश वाबळे, दिलीप पांढरकर, खंडूशेठ चिंचवडे, महिला शहर संघटिका सरिता साने, युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, शहर युवा प्रमुख प्रदीप पवार, उपजिल्हा युवा प्रमुख हर्षवर्धन पांढरकर, सायली साळवी, प्रशांत कडलग, दिलीप कुसाळकर, प्राजक्ता पांढरकर, रंजना बहिरट, , महेश कलाल, नारायण लांडगे, मुकुंद ओव्हाळ, ऋतू कांबळे, सुवर्णा कुटे, जय साने, सोनाली वाल्हेकर, दुर्गा पांढरकर, अश्विनी बागुल, उज्वला तोमर, श्वेता कापसे, मीनल भालेराव, पौर्णिमा अमराव, सुनीता शर्मा, शारदा वाघमोडे, सुवर्णा तडसरे, उषा म्ह, रंजना सोनवणे, शकुंतला जाधव, संगीता परदेशी, चक्रवर्ती वर्मा, प्रयाग बहिरट, सय्यद पटेल, सागर पुंडे, रुपेश चांदेरे आदी उपस्थित होते.
शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस म्हणाले की, शिवसेना सदस्य नोंदणी अभियानात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करावेत.