वारकरी संप्रदाय घराघरात रुजावा-हभप. डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर 

Date:

पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त लोकशिक्षणपर अभिनव कार्यक्रम

पुणे, २९ जूनः आजची पिढी भक्तीमार्गापासून दूर होत चालली आहे. स्वतःचा उध्दार करायचा असेल तर खऱ्या अर्थाने निश्चय करणे महत्त्वाचे आहे.  त्यासाठी लहानपणापासूनच  वारकरी संप्रदायाचं  महत्त्व बालकांमध्ये रूजविणे गरजेचे आहे.  जेणेकरून या वारीत वृद्धांबरोबरच  युवकही भक्तीमार्ग स्वीकारून  पांडुरंगाच्या चरणी लीन होतील.  असे विचार ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माइर्स एमआईटी, पुणे आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ विश्वरूप दर्शन मंच श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीच्या लोकशिक्षणपर अभिनव उपक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, उषा विश्वनाथ कराड,  श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड चाटे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, गिरीश दाते, डॉ. टी.एन.मोरे व ह.भ.प.डॉ. सुदाम महाराज पानेगांवकर उपस्थित होते.
ह.भ.प.डॉ. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणेकर म्हणाले, वारकर्‍यांमध्ये संख्यात्मक नको तर गुणात्मकतेने वाढ व्हावी. वर्तमानकाळात लहान मुलांना संस्कार देण्यासाठी संप्रदायाचे शिक्षण देणारी शिक्षण व्यवस्था हवी आहे. नवी पिढी मोबाइल व्यसनाधिन झाली असून त्यांना या पासून परावृत्त करावे. निष्ठावंत वारकरी बनून संसाराची आसक्ती कमी करावी. तसेच मोक्ष प्राप्तीसाठी ध्येय साध्य करावे तरच खऱ्या अर्थाने  आध्यात्मिक उन्नती, सुख, शांती आणि समाधान लाभेल
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, भक्तीच्या वाटेवर चालतांना मी पणा सोडून दयावा लागतो. कर्मयोग अत्यंत महत्वाचा असून सतत शिकत रहावे. कर्माबरोबर आचरणातून आपला व्यवहार दिसावा. महाभारताचा अभ्यास केल्यावर जाणवते की मना विरूद्ध सतत गोष्टी घडत असतात. त्यासाठी विरोधाभास  गरजेचा असतो. अशा वेळेस दृढ निश्चयाने व सद् सद् विवेक बुद्धीने कार्य करत रहावे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वै. बाबामहाराज सातारकर यांच्या सुकन्या ह.भ.प.श्रीमती भगवतीताई दांडेकर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.
हभप शालिकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले. हभप महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चंद्रकांतदादांनी कोथरुडमध्ये भरवली बालकलाकारांची ‘शाळा’

चंद्रकांतदादांनी कोथरुडमध्ये भरवली बालकलाकारांची ‘शाळा’ चिमुकलीच्या अभिनयाला दिली मनमुराद दाद! पुणे:...

जनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी

पुणे, दि.२९: 'जनगणना २०२७' अंतर्गत स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी...

बारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे...

राज्य रिंग टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदी मोहन जोशी: महासचिवपदी अनिल वर्षे यांची फेरनिवड

पुणे : टेनीकॉईट (रिंग टेनिस) असोसिएशन, महाराष्ट्र या संघटनेच्या...