Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

यंदा तुकाराम महाराम पालखीच्या विसावा ठिकाणात बदल, गाडीतळमध्ये मुक्काम नसणार

Date:

पुणे-संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा विसावा गाडीतळ येथील हरपळे बिल्डिंग येथे दर वर्षी केला जात होता. मात्र, तेथे जागा कमी असल्यामुळे मागील वर्षी चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे यंदा विसाव्याची जागा हरपळे बिल्डिंगऐवजी तेथून पुढे सोलापूर रोडकडून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर मंडपात करण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत मान्यता ही घेतली आहे, असे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पालखी आढावा बैठकीत जाहीर केले.
हडपसर मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा विसावा हडपसरमधील गाडीतळ येथे असतो. या सोहळ्याच्या नियोजनाची बैठक हडपसर पोलिस ठाण्यात झाली. या वेळी शहर परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त आर. राजा, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता प्रवीण कळमकर, माजी नगरसेवक मारुती तुपे आदी उपस्थित होते.भैरोबा नाला ते गाडीतळापर्यंत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या फांद्या हटवाव्यात, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, वारकऱ्यांना फराळाचे वाटप शिस्तबद्ध व्हावे, भाविकांचा घोळका होऊ नये यासाठी पोलिसांचे नियोजन असावे, पालिकेकडून जागोजागी फिरते स्वच्छतागृह ठेवावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आदी सूचना बैठकीत करण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...