Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

अमली पदार्थांविरोधात सोमेश्वर फाउंडेशनची व्यापक जनजागृती मोहीम

Date:

माजी नगरसेवक सनी निम्हण यांची माहिती

पुणे-विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, आयटी आणि उद्योग नगरी अशी ओळख असणारे पुणे शहर ड्रगच्या विळख्यात अडकले असल्याचे भीतीदायक वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा देशपातळीवर मलीन होत असून, उद्योग धंद्याच्या विकासाला खीळ बसणार आहे

या सर्व बाबींचा विचार करून तरुण पिढीला ड्रग्स आणि अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने दीर्घकालीन, व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी कळविली आहे.

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्या 26 जून रोजी सकाळी 9.00 वाजता संभाजी पार्क जंगली महाराज रस्ता येथे करण्यात येणार आहे.

शहरातील प्रथितयश व्यंगचित्रकार ‘पुणेकरांनो, एकत्र येऊन अमली पदार्थांच्या विरोधात लढू या’ असा संदेश आपल्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून देणार आहेत. कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थेचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे.

चारुहास पंडित, बैजनाथ दुलंगे, घनश्याम देशमुख, धनराज गरड, विश्वास सूर्यवंशी, अतुल पुरंदरे, योगेंद्र भगत, शरयू फरकांडे, लहू काळे, राम मांडुरके, गौतम दिवार, चैतन्य गोवंडे हे व्यंगचित्रकार सहभागी होणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...