Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आमदार पुतण्याला काही तासांतच जामीनाचा मार्ग मोकळा; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Date:

पुणे-

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी अजून अटकेत असतानाच पुण्यात आज पुन्हा एकदा हाय प्रोफाईल कार अपघाताची घटना घडली आहे. आमदाराच्या पुतण्यानेच बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीवरील दोघांना उडवल्याची माहिती आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरू आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरीस कळंब येथे दुचाकी आणि कारचा हा भीषण अपघात झाला. पुण्यातील खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर मोहिते याने आपल्या कारने दोघांना उडवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 304 अंतर्गत गुन्हा दाखल झाला, तरीही पोलिस कोठडी न मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडले, त्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोर्शे कार अपघाताची आठवण पुणेकरांना झाली. कारण, अपघाताची घटना घडल्यापासून मंचर पोलिसांच्या भूमिकेवर संशय घेतला जात होता. अखेर आमदार पुतणे मयूर मोहितेची पोलिस कोठडी मिळविण्यात मंचर पोलीस अपयशी ठरल्याने, त्यावर शिक्कामोर्तब झाला.
घोडेगाव न्यायालयाने मयुरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याने अपघातानंतर काही तासांतच मयुरच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिसांनी कठोर कलमं लावून, न्यायालायत भक्कम बाजू मांडली असती तर नक्कीच मयुरला पोलिस कोठडी मिळाली असती. मात्र, सुरुवातीपासून पोलिस दबावाखाली काम करत असल्याचे बोलले जात आहे. त्यावर, न्यायालयाने गंभीर गुन्ह्यातही आरोपीला थेट न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सद्या पुण्यात रंगू लागली आहे.
माझ्या पुतण्याने ड्रिंक केलेले नाही
पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या पुतण्यानं आपल्या कारनं दोघांना चिरडलं. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये नेमकं काय आढळतं याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अपघातानंतर मयूर मोहिते पाटील गाडीतच बसून राहिला, तो गाडीबाहेर आलाच नाही, असं स्थानिकांनी सांगितलं आहे. यासर्व चर्चांवर आमदार दिलीप मोहिते पाटलांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यपानही केलेलं नव्हतं, असा दावा आमदार दिलीप मोहितेंनी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...