Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळ बीआयटी वसाहतीत प्रवेशद्वार उभारावे

Date:

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई दिनांक १९ जून २०२४
परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या परळच्या बीआयटी वसाहतीपर्यंत पोहचताना अनुयायी तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांना मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर वास्तूला स्मारक स्वरुपात विकसित करुन दोन्ही बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना देण्यात आले. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे साक्षी दरेकर, भरत घोलप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

परळ विभागात बीआयटी वसाहत असून त्याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९१२ ते १९३२ या कालावधीत आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास होते. त्यांनी या ठिकाणाहून सामाजिक चळवळीला सुरुवात केली होती. त्यामुळे ही वास्तु पाहण्यासाठी देश- विदेशातून हजारोंच्या संख्येने पर्यटक तसेच अनुयायी येत असतात. परंतु त्या वास्तुपर्यंत पोहचण्यासाठी लोकांना अडचण होते. त्या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक तसेच कमान नाही. त्यामुळे पर्यटक तसेच अनुयायींना अडचणींना सामोरे जावे लागते.या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी बीआयटी वसाहतीच्या दोन्ही बाजूला म्हणजेच परेल ब्रीजच्या बाजूस विठ्ठल चव्हाण मार्ग या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे तसेच प्रभादेवी परेल स्थानक येथून येणाऱ्या मार्गावर सुभाष डांबरे रोड या ठिकाणी सन्माननीय माता रमाई यांच्या नावाचे प्रवेशद्वार उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी भाजपा शिष्टमंडळाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...