तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना अभिनीत तमिळ हॉरर-कॉमेडी हिट ‘अरनमानाई 4’ साठी OTT रिलीज साठी सज्ज झाला असून हा चित्रपट २१ जूनपासून Disney+ Hotstar रिलीज होणार आहे. ‘ अरनमानाई 4’ मध्ये तमन्ना आणि अष्टपैलू पॉवरहाऊस अभिनेत्री राशि खन्ना या दिघी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. याने तमिळ बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवून पहिला मोठा हिट चित्रपट म्हणून उदयास आला.
चित्रपटाच्या यशाने तमन्ना ही बॉक्स ऑफिस क्वीन असल्याचे सिद्ध केले आहे तर राशी खन्नाला तमिळ सिनेमाची गोल्डन गर्ल म्हणून प्रस्थापित केले आहे कारण या चित्रपटाने ‘तिरुचित्रंबलम’ आणि ‘सरदार’ नंतर तिसरा बॉक्स ऑफिस ब्लॉकबस्टर ठरला आहे. तमिळ बॉक्स ऑफिसवर मोठ्या यशानंतर हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी देखील प्रदर्शित करण्यात आला. आता जगभरातील चाहते OTT प्लॅटफॉर्मवर याचा आनंद घेऊ शकतात.
चित्रपटातील कलाकारांमध्ये संतोष प्रताप, रामचंद्र राजू, कोवई सरला, योगी बाबू, केएस रविकुमार, जयप्रकाश, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश, राजेंद्रन आणि सिंगमपुली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘अरनमानाई 3’ या मागील भागालाही लक्षणीय यश मिळाले.