१ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची वोट बचाओ, देश बचाओ भव्य महारॅली..
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर २६
दिल्लीच्या रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्यातील, प्रमुख नेते खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे विविध सेल व विभागाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे पाच हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुढाकाराने इंडिया आघाडीने रणशिंग फुंकले आहे. हा लढा संसदेत व संसदेबाहेर रस्त्यावरही लढला जात आहे. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून ही महारॅली आयोजित करण्यात आली आहे. देशातील निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे होत नाहीत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे मोदी-शाह यांच्या हातचे बाहुले बनून काम करत आहे. मतदार यादीत मोठा घोटाळा केला जात आहे. एसआयआरच्या नावाखाली १३ कोटी नावांची कपात करण्यात आली आहे. मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे पण भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदानाचा हक्क हिरावून घेत आहे. भाजपा सरकार लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत आहे, या विरोधात हा लढा आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दिली आहे.

