· दमदार आणि कार्यक्षम इंजिन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भात लावणीची कार्यक्षमता वाढवणार
· महिंद्राच्या शेती उपकरणे वितरकांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये उपलब्ध, महिंद्रा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि आघाडीच्या वित्त संस्थांतर्फे ७५ टक्क्यांपर्यंत वित्तपुरवठ्याची सोय
· महिंद्राच्या नव्या साथी अॅपद्वारे घरबसल्या सर्व्हिसिंगवर देखरेखीची सोय
पुणे, 17 जून २०२४ – महिंद्रा अँड महिंद्रा इक्विपमेंट सेक्टर (एफईएस) या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या आणि आकडेवारीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक असलेल्या कंपनीने राज्यात महिंद्रा 6RO पॅडी वॉकर नावाचे भातलावणीसाठी सहा रांगांचे ट्रान्सप्लँटर लाँच केले आहे.
महाराष्ट्रात 4RO वॉक बिहाइंड ट्रान्सप्लँटर (एमपी४६१) आणि 4RO राइड- ऑन (प्लँटिंग मास्टर पॅडी 4RO) यशस्वीपणे लाँच केल्यानंतर महिंद्राचे नवे 6RO पॅडी वॉकर भात लावणी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे आघाडीचे स्थान आणखी मजबूत करेल. महाराष्ट्रात भात हे प्रमुख पिकांपैकी एक असून राज्य भाताच्या विविध जातींसाठी प्रसिद्ध आहे. भात लावणीसाठी यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पहिल्या काही राज्यांमध्येही महाराष्ट्राचा समावेश होतो. राज्याच्या विविध भागांत दर्जेदार भात पिकवला जातो. नवीन उपकरणामुळे पाण्याचे संवर्धन होईल, पर्यावरणावर कमी परिणाम होईल व त्याचप्रमाणे मनुष्यबळाची गरज असणाऱ्या इतर उपकरणांच्या तुलनेत मनुष्यबळावर होणारा खर्चही कमी होईल. सोबत भातशेतीशी संबंधित एकंदर नफ्यातही वाढ होईल.
नवीन महिंद्रा 6RO पॅडी वॉकरद्वारे दर्जेदार ऑपरेटर कार्यक्षमता पुरवली जाते व ते अचूक व कार्यक्षम रोपलावणीच्या हेतूने तयार करण्यात आले आहे. हे उपकरण भात लावणी क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करेल. मॅन्युअली वापरता येणाऱ्या नव्या ट्रान्सप्लँटरचे डिझाइन आटोपशीर असून ते लहान जागेत फिरवण्यासाठी सोपे आहे. त्यामुळे एकाच पासमध्ये एकाच वेळी सहा रांगांमध्ये एकसमान पद्धतीने रोपे लावता येतात. ताकद, टिकाऊपणा आणि कामगिरी यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या नव्या पॅडी ट्रान्सप्लँटरमध्ये दीर्घकाळ टिकण्याची क्षमता असलेला गियरबॉक्स आणि ४ लीटर क्षमतेचे दमदार इंजिन बसवण्यात आले आहे. यामुळे चांगले उत्पादन मिळते, कमी इंधन वापरले जाते आणि भातलावणीची उत्पादनक्षमता वाढते व दोन सर्व्हिसिंगमधला कालावधी वाढतो.
परतफेडीसाठी २ वर्षांचा कालावधी आणि ऑपरेटिंगसाठी फक्त २०० एकर्सचा किमान परिसर यांसह हे राइस प्लँटर भाडेशुल्कावर देण्याच्या व्यवसायासाठीही चांगले आहे. महिंद्राच्या महाराष्ट्रातील शेती यंत्रणा वितरकांच्या विस्तारित नेटवर्कद्वारे हे उपकरण उपलब्ध आहे. त्याशिवाय नव्या, युजर फ्रेंडली महिंद्रा साथी अॅपद्वारे त्याचे तत्काळ घरबसल्या सर्व्हिसिंगवर देखरेख करता येऊ शकते. नवीन महिंद्रा 6RO पॅडी वॉकर तसेच भात लावणीसाठीची महिंद्राची संपूर्ण श्रेणी महिंद्रा फायनान्स व श्रीराम फायनान्सच्या सर्वोत्तम वित्त पर्यायांसह उपलब्ध करण्यात येणार आहे.