Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मतदार यादीत नाव येण्यासाठी जागरूक राहावे’

Date:

पुणे :मतदारांच्या प्रभावी आणि संघटीत जनआंदोलनातून आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन करण्याच्या हेतूने भारत जोडो अभियानच्या वतीने मतदार नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.रविवार, १६ जुन २०२४ रोजी ,दुपारी अडीच वाजता  साने गुरुजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे येथे ही कार्यशाळा झाली.
ऋषिकेश येवलेकर यांनी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सहभागींना मार्गदर्शन केले. या वेळी संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले.ऋषिकेश येवलेकर म्हणाले “संविधानाने भारतीय नागरिकांना सर्वात महत्वाचा दिलेला अधिकार म्हणजे मतदान करणे हा आहे. मतदार यादीत नाव नसणे म्हणजे एक प्रकारचा मृत्यूच होय. त्यामुळे मतदार यादी मध्ये आपले नाव आहे की नाही, हे आपण आपल्या मोबाईलवर ‘व्होटर हेल्पलाईन’ या ऍप  द्वारे घरबसल्याही तपासून बघता येते.’आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र असेल तर त्यावरील एपिक नंबर या ऍप  मध्ये टाकून आपले नाव या यादीत आहे की नाही हे तपासून पाहता येते’ अशीही माहिती येवलेकर यांनी दिली.निवडणूक ओळखपत्रावरील क्यू आर कोड द्वारे सुद्धा आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासता येते, 

नवीन मतदार नोंदणीसाठी सहा नंबरचा अर्ज याच ऍप वर मोबाईल वरून भरता येईल, तसेच घरातील कोणी व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नाव वगळण्यासाठी सात नंबरचा अर्जही  भरता येईल,नवीन मतदार नोंदणीसाठी मतदाराचे आधार कार्ड, जन्म दाखला, लाईट बील, वाहन परवाना, दहावी मार्क शीट, पासपोर्ट, भाडे करार बॅंक पासबुक आवश्यक पण वरील कोणतीही कागदपत्रे नसली तरी बीएलओला त्या व्यक्तीने तीन वेळा व्हेरीफाय केले तर अशा अगदी रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीचेही नाव मतदार यादीत येऊ शकते, अशीही माहिती येवलेकर यांनी दिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीतून जाणूनबुजून वगळण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरुक होऊन स्वतःचे नाव यादीत यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ‘असेही मत येवलेकर यांनी व्यक्त केले.
संदीप बर्वे(सचिव, पुणे जिल्हा,भारत जोडो अभियान),इब्राहीम खान(समन्वयक, पुणे लोकसभा मतदारसंघ,भारत जोडो अभियान),एकनाथ पाठक (सहसचिव, पुणे जिल्हा भारत जोडो अभियान) ,नीलम पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...