मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला अतिशय दिमाखदार सोहळ्याने प्रारंभ

Date:

मुंबई, 15 जून 2024

जागतिक दर्जाच्या समांतर सिनेमाच्या जादुई विश्वाला भारतभरातील  चित्रपट रसिकांच्या जवळ आणणाऱ्या, सात दिवस चालणाऱ्या माहितीपटलघुपट आणि ऍनिमेशनपटांच्या 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे माहिती आणि प्रसारण  राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे संस्कृती मंत्री सुधीर  मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

उद्घाटन समारंभात बीजभाषण करताना मुरुगन म्हणाले की MIFF हे जगभरातील चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणणारे एक प्रतिष्ठित व्यासपीठ आहे. खऱ्या अर्थाने भावना दर्शविण्यासाठी लघुपट महत्त्वाची भूमिका बजावतात. यावेळच्या मिफ मध्ये बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होत असल्याचे माहिती प्रसारण राज्यमंत्री म्हणाले. यावेळी प्रथमच मिफचे स्क्रीनिंग ठिकाणी होईल. मुरुगन पुढे म्हणाले की भारत हे मनोरंजनविषयक आशय निर्मितीचे केंद्र आहे. कथा सांगण्याची आपली परंपरा आहे. आपण आपल्या आई आणि आजींच्या कथा ऐकत मोठे झालो आहोत.

त्यांनी पुढे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे सुरू केलेल्या  चित्रपट सुविधा कार्यालयाची माहिती दिली.  एकल खिडकी प्रणाली मध्ये  चित्रपट निर्मात्यांना एकाच व्यासपीठावरून सर्व मान्यता मिळतात. जेणेकरून त्यांना विविध सरकारी यंत्रणांकडे धावपळ करावी लागत नाही.

सिनेमॅटोग्राफ कायद्यात सुधारणा करून सरकार पायरसीची चिंता दूर करत आहे. असे शेवटी मुरुगन म्हणाले.

चित्रपट विश्वातील सर्वोत्तम अनुभव देणाऱ्या सप्ताहासाठी एक मंच सज्ज करत आज माहितीपटलघुपट आणि ऍनिमेशनपटांच्या 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुंबईत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स(एनसीपीए) येथे एका अतिशय दिमाखदार आणि झगमगत्या सोहळ्यात प्रारंभ झाला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून दर दोन वर्षांनी आयोजित होणारा आणि या मंत्रालयाची नोडल संस्था असलेल्या  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून(एनएफडीसी) व्यवस्थापन होत असलेला हा प्रतिष्ठेचा चित्रपट महोत्सव चित्रपट निर्मातेउद्योगातील व्यावसायिक आणि चित्रपट रसिकांना एकसमान समृद्ध अनुभवाची हमी देतो. यावर्षी मिफ्फने  एकाच वेळी भारतातील पाच शहरांमध्ये चित्रपट प्रदर्शन आणि लाल गालिचावरील कार्यक्रमांचे आयोजन करून महोत्सवाची व्याप्ती वाढवली आहे.

उद्घाटन समारंभातप्रख्यात पुरस्कार विजेते वन्यजीव चित्रपटकार सुब्बिया नल्लामुथु यांना यावर्षी व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहितीपट आणि भारतामधील ही चळवळ यामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या चित्रपट निर्मात्याला मिफ्फच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये जीवनगौरवर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 10 लाख रुपये रोखट्रॉफी आणि एक स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 1950 च्या दशकात मानद मुख्य निर्माते म्हणून फिल्म्स डिव्हिजनसोबत अतिशय घनिष्ठ संबंध असलेले महान चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार नेहमी पाठीशी असलेल्या आपल्या माता-पित्यांना समर्पित करत असल्याचे सुब्बिया नल्लामुथु यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा सत्रासाठीचे ज्युरी सदस्य  केको बँगबार्थेलेमी फोगियाऑड्रिअस स्टोनीसभरत बाला आणि मानस चौधरी यांचा  या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.  राष्ट्रीय स्पर्धा ज्युरी सदस्य ॲडेल सीलमन-एगेबर्टडॉ बॉबी सरमा बरुआअपूर्व बक्षीमुंजाल श्रॉफ आणि अॅना हेन्केल-डोनर्समार्क यांचाही सत्कार करण्यात आला.

रणदीप हुडा, दिव्या दत्तामधुर भांडारकर, सोनाली कुलकर्णी आणि इतर मान्यवर या भव्य सोहळ्याला  उपस्थित होते.

यावर्षीच्या महोत्सवात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकल्याबद्दल मी नल्लामुथू यांचे अभिनंदन करतो”असे मुरुगन यांनी एनएफडीसी संकुलात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. वन्यजीव चित्रपट निर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार सुब्बिया नल्लामुथु यांना मिफ्फ मध्ये दिला गेला.

तत्पूर्वीचार्ली हॅमिल्टन जेम्स दिग्दर्शित “बिली अँड मॉलीॲन अटर लव्ह स्टोरी” या नॅशनल जिओग्राफिकच्या माहितीपटाच्या भारतातील  प्रीमियरने  महोत्सवातील स्क्रिनिंगला प्रारंभ झाला.  या चित्रपटात  प्रेमाची अमर्याद सखोलता  तसेच  मानव आणि निसर्ग यांच्यातील अगाध  बंधांचे चित्रण आहे.

यावेळी नेटफ्लिक्स इंडिया आणि माहिती आणि  प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या आजादी की अमृत कहानिया या विशेष कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली ही सामाजिक क्षेत्रात नवाचार आणणाऱ्या नायकांची कथा सांगणारी सिरीज असणार आहे. नेटफ्लिक्स इंडिया ही नेहमी मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड या भावनेने काम करत असल्याचे यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष आदित्य कुट्टी म्हणाले.

नवोदित निर्मात्यांसाठी MIFF ही एक उत्तम संधी आहे. यामुळे खूप शक्तिशाली जागतिक बाजारपेठ आमच्यासाठी उघडली आहे असे अभिनेते सौरभ सचदेवा यावेळी म्हणाले.

भव्य उद्घाटन समारंभात सांस्कृतिक  कलात्मक वैविध्यपूर्ण मेळ दिसून आला,  ज्यामध्ये भारतीय ॲनिमेशनचा प्रवास दर्शवणारा  अभिनयश्रीलंकेचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचा  “सनफ्लॉवर्स वेर द फर्स्ट वन टू नो” या लघुपटाच्या प्रदर्शनाचा समावेश होता. या वर्षीच्या 77व्या कान चित्रपट महोत्सवात या लघुपटाने ला सिनेफ पुरस्कार पटकावला होता.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका रंगिका जिवंथा  यांनी तयार केलेल्या श्रीलंकन कलात्मकतेच्या 45 मिनिटांच्या सादरीकरणाने श्रीलंकन सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रतिष्ठित रिवेगा डान्स स्टुडिओच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मोर नृत्याने या राजसी  पक्ष्याचे सौंदर्य जिवंत केले. पारंपारिक वान्नामा नृत्याने प्रेरित या सादरीकरणात सुबक हालचाली  आणि नादिका वेलीगोडापोला यांनी संगीतबद्ध केलेले  मंत्रमुग्ध करणारे संगीत होते. या सादरीकरणात श्रीलंकन फ्यूजन डान्स धरणी‘ आणि एक मनमोहक लोकनृत्य गामी असिरिया‘ यांचाही समावेश होता.

श्रीलंकेच्या सादरीकरणानंतर क्रेझी किंग्ज डान्स क्रूने भारतीय ॲनिमेशनचा इतिहास सांगणारा 15 मिनिटांचा आकर्षक प्रवास सादर केला. इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 9 आणि हिपॉप इंडिया टॉप 12 च्या या धडाडीच्या गटाच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. त्यांच्या सादरीकरणात ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्स आणि डिस्नेनिकेलोडियनसोनी आणि कार्टून नेटवर्क सारख्या आयकॉनिक स्टुडिओमधील कॅरेक्टर मॅस्कॉट्सनी सर्व वयोगटातील ॲनिमेशन उत्साही लोकांना जुन्या आठवणींचा एक आनंददायी प्रवास उलगडून दाखवला.

संध्याकाळी  भारतातील पहिले डान्सिंग आयकॉन्स आणि डान्स प्लस सीझन 1 चे विजेते यांच्या व्ही कंपनी ने सादर केलेल्या 15 मिनिटांच्या दमदार सादरीकरणाने उद्घाटन सत्राचा समारोप झाला. उत्साही दमदार नृत्यशैली आणि प्रेरणादायी कथेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या प्रख्यात क्रू ने सामान्य पार्श्वभूमी ते भारतातील सर्वात प्रसिद्ध नृत्य गटांपैकी  एक बनण्यापर्यंतचा आपला  प्रवास यातून मांडला.

मिफ 18 चे ठळक मुद्दे:

  • यंदाच्या मिफ महोत्सवात, 59 देशांचे 61 भाषांमधील एकूण 314 चित्रपट प्रदर्शित केले जाणार. यामध्ये 8 जागतिक प्रीमियर, 5 आंतरराष्ट्रीय प्रीमियर, 18 आशिया प्रीमियर आणि 21 भारत प्रीमियर्सचा समावेश.
  • मुंबईत FD-NFDC कॉम्प्लेक्स येथील प्रमुख आयोजन स्थळा व्यतिरिक्तदिल्ली (सिरीफोर्ट ऑडिटोरियम)चेन्नई (टागोर फिल्म सेंटर)पुणे (NFAI सभागृह) आणि कोलकाता (SRFTI ऑडिटोरियम) येथे MIFF चे स्क्रिनिंग (चित्रपट प्रदर्शन) आयोजित केले जाईल.
  • चित्रपट निर्माते संतोष सिवनऑड्रिअस स्टोनीसकेतन मेहतारिची मेहताटी.एस. नागभरणाजॉर्जेस श्विजगेबेल आणि यासारख्या चित्रपट उद्योगातील दिग्गजांबरोबर 20 मास्टरक्लास (प्रशिक्षण वर्ग)संभाषण सत्रे आणि पॅनेल चर्चा सत्रांचे आयोजन.
  • इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्युसर्स असोसिएशन (आयडीपीए) च्या सहयोगाने, NFDC कॉम्प्लेक्स येथे ॲम्फीथिएटर मध्ये ओपन फोरम (खुल्या) चर्चा सत्रांचे आयोजन. राष्ट्रीय स्तरावर ख्यातनामचित्रपटसृष्टीतील नामवंत व्यक्तींचा सहभाग.
  • नोंदणीकृत सहभागींसाठी ॲनिमेशन आणि VFX पाइपलाइनवरील कार्यशाळा.
  • चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या प्रकल्पांसाठी खरेदीदारप्रायोजक आणि सहयोगी शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करूनचित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी प्रथमच ‘डॉक (DOC) फिल्म बझार’ चे आयोजन.
  • ऑस्कर आणि बर्लिन चित्रपट महोत्सवातील चित्रपटॲनिमेशन चित्रपटनामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांचे चित्रपट आणि NFDC-नॅशनल फिल्म आर्काइव्हज ऑफ इंडिया द्वारे पुनर्संचयित क्लासिक चित्रपटांचे विशेष खेळ.
  • रशियाजपानबेलारूसइटलीइराणव्हिएतनाम आणि माली या 7 देशांच्या सहयोगाने ‘स्पेशल कंट्री फोकस पॅकेजेस’
  • अमृत काळातील भारत’ या विशेष संकल्पनेवर आधारित देशाचा विकासप्रगती आणि समृद्धी प्रदर्शित करणाऱ्या स्पर्धात्मक चित्रपटांचे प्रदर्शन.
  • दिव्यांगजन पॅकेज अंतर्गत दृष्टिहीन आणि श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी चित्रपट.
  • वन्यजीवमिशन लाइफ आणि आशियाई महिला चित्रपट निर्मात्यांच्या चित्रपटांचे निवडक पॅकेज.
  • स्वयम (Svayam) या स्वयंसेवी संस्थेच्या भागीदारीमधून महोत्सवाचे आयोजन स्थळ दिव्यांगजनांच्या दृष्टीने सहज प्रवेश योग्य बनवण्यात आले आहे.
  • मुंबईत NFDC कॉम्प्लेक्स येथील रेड कार्पेट सोहळ्यांशिवायदिल्ली (17 जून)चेन्नई (18 जून)कोलकाता (19 जून) आणि पुणे (20 जून) येथे विशेष रेड कार्पेट सोहळ्यांचे आयोजन. चित्रपट क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार.

मिफ महोत्सवात पुढील चित्रपट कर्मींना आदरांजली वाहण्यात आली.

  • कुमार सहानी
  • विवान सुंदरम
  • नवरोज कंत्राटदार
  • बी आर शेंगडे
  • दीपक हळदणकर
  • केपी ससी
  • श्रीयांका रे
  • सौमेंदु रे
  • अनुप मुखर्जी
  • चंदन सर्मा
  • पॉल वॉटसन
  • जॉन पिल्गर
  • मायकेल रोग
  • जेस सर्च
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...