पुणे-पुणे महानगरपालिकेच्या सभागृहातून खासदार होऊन थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणारे पहिलेच पुण्याचे माजी महापौर म्हणून आता मुरलीधर मोहोळ यांची नोंद होईल .महापालिकेच्याच सभागृहातून अनिल शिरोळे, गिरीश बापट खासदार झाले पण त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. महापालिकेच्या सभागृहात नसलेले पण पुण्याचे खासदार होऊनच सुरेश कलमाडी मंत्रिमंडळात गेले . अगदी गणपती मंडळ कार्यकर्ता , बूथ वरचा कार्यकर्ता , वॉर्डात ला कार्यकर्ता नगरसेवक , स्थायी समिती अध्यक्ष महापौर आणि खासदार आता केंद्रीय मंत्री स्तरावर असा राजकीय प्रवास असलेल्या मोहोळ यांचे आता सर्वच स्तरावरून अभिनंदन होऊ लागले आहे.
मुळशी तालुक्यातील मुठा गावातील किसनराव मोहोळ यांचे कुटुंब नोकरी आणि मुलांच्या शिक्षणासाठी साधारणपणे 1985 च्या सुमाराला पुण्यातील कोथरुडमध्ये आले. ज्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासह तीन भावंडे. या तिघांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण मूळ गावी झाले. त्यातले धाकटे मुरलीधर मोहोळ. त्यांनी भावे स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. मोहोळ कुटुंबाला तशी पहिलवानकीची पार्श्वभूमी. पुण्यातील खालकर आणि निंबाळकर तालमीनंतर कुस्तीसाठी मुरलीधर मोहोळ हे कोल्हापुरला गेले आणि तिथेच पदवीपर्यंतचे (कला शाखा) शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठात शिकत असतानाच ते कसबा बावड्यातील शासकीय कुस्ती केंद्राच्या आखाड्यात उतरले. याच काळात त्यांनी आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरच्या आखाड्यापर्यंत मजल मारली. त्यानंतर कॉलेज संपवून ते 1996 च्या सुमारास पुण्यात परतले. तेव्हा कुस्तीचा नाद सोडून ते राजकीय आखाड्याकडे अधिक वळले.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक…
- गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ता…
- बूथ प्रमुख म्हणून भाजपामध्ये कामाला सुरुवात…
- युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवपदाचीही संधी…
- संघटनेत ३० वर्षे कार्यरत…
- सांस्कृतिक-क्रीडा क्षेत्रातही योगदान…
- २००२, २००७ आणि २०१७ साली कोथरुडमधून नगरसेवक
- २०१७ : साली स्थायी समिती धुरा…
- २०१९ : पुण्याच्या महापौरपदीसंधी…
- कोरोना काळात विविध पातळ्यांवर ैभरीव काम
- २०२० : अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी…
- २०२२ : सरचिटणीस, महाराष्ट्र भाजपा
- २०२२ : पश्चिम महाराष्ट्राची भाजपाची जबाबदारी
- ४ जून, २०२४ : खासदार, पुणे