पुणे- राजकीय गोटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार नसल्याची सध्या चर्चा सुरू आहे.. यासंदर्भात सुनील तटकरेंच्यानिवासस्थानी बैठक झाली. यानंतर आता देवेंद्र फडणवीस आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहचलेत. दरम्यान काही वेळापूर्वी मंत्रिपदासाठी अद्याप फोन आला नसल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांना दिली. यानंतर आता फडणवीस तटकरेंच्या घरी पोहचलेत त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मंत्रिमंडळात कोण शपथ घेणार हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. संध्याकाळी 7.15 ला शपथविधी आहे तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही.. याबाबत अधिक माहिती अजित पवार देतील. मात्र कार्यकर्ता म्हणून आम्हाला विश्वास आहे. संध्याकाळी 7.15 ला शपथविधी आहे. तोपर्यंत फोन आला तर आम्हाला आनंदच आहेत. अजून सात तास वेळ आहे. तोपर्यंत काही घडामोडी होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत सुनील तटकरेंच्या घरी बैठक सुरू आहे. या बैठकीला पफुल पटेल देखील पोहचले आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्री पद मिळालेले नाही. प्रफुल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी नाव आघाडीवर होते.त्यांना फोन येईल अशी अपेक्षा होती, परंतु दुपारी 12 पर्यंत पटेलांना फोन आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही, असे स्पष्ट होत आहे. त्यात देवेंद्र फडणवीस देखील सुनील तटकरेंच्या निवासस्थानी पोहचले आहेत.त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.