पुणे शहर भाजपा मध्ये आनंदाचे वातावरण
पुणे- गेल्या आठ वर्षात कुणाचीही एवढ्या वेगाने राजकारणात प्रगती झाली नसेल एवढ्या वेगाने पुण्याच्या मुरलीधर मोहोळांना राजकीय प्रगतीची द्वारे फटाफट खुली होत जात असल्याचे दिसून येत आहे.नगरसेवक,स्थयी समिती अध्यक्षपद,महापौर पद,आणि नंतर थेट खासदार आणि आता थेट केंद्रीय मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडत असल्याचे वृत्त आहे. मोहोळ यांच्या राजकीय प्रगतीने असंख्य चाहते आनंदात आहेत तर राजकारणात अनेक वर्षे घालविलेले मंडळी तोंडात बोटे घालून का होईना या प्रगतीबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहेत.दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीय मंत्रिपद उदयन राजे यांना देण्या ऐवजी मोहोळ यांच्याकडे देण्याचा निर्णय झाल्याचे समजते.क्रीडा किंवा माहिती आणि प्रसारण खाते त्यांना मिळेल असा अंदाजही व्यक्त केला जातोय
पुण्याचे भाजप महायुतीचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची देशाच्या NDA सरकारमध्ये वर्णी लागली आहे. थोड्याच वेळापूर्वी त्यांना पंतप्रधान कार्यालयातून यासंदर्भात दूरध्वनीवरून सुचित करण्यात आलेले आहे. पहिल्यांदाच पुण्यातून खासदार झालेले मोहोळ यांना भाजपकडून तरुण चेहरा म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला याचा फायदा होईल अशी चर्चा आहे. भाजपा सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे पुणे शहर भाजपा मध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आतापर्यंत कुणाकुणाला मंत्रीपदाच्या शपथेसाठी फोन आलेत
१. जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा
२. जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल
३. अनुप्रिया पटेल, अपना दल
४. डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी
५. के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी
६. नितीन गडकरी, भारतीय जनता पार्टी
७. राजनाथ सिंह, भारतीय जनता पार्टी
८. अमित शाह, भारतीय जनता पार्टी
९. अर्जुनराम मेघावाल, भारतीय जनता पार्टी
१०. राम नाथ ठाकुर, जनता दल युनायटेड
११. एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर
१२. सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन
१३. चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास)
१४. मनसुख मांडविय, भारतीय जनता पार्टी
१५. पवन कल्याण, जनसेवा पार्टी (होल्ड)
१६. पियुष गोयल, भारतीय जनता पार्टी
१७. ज्योतिरादित्य शिंदे, भारतीय जनता पार्टी
१८. प्रतापराव जाधव, शिवसेना
१९. कमलजीत सेहरावत, भारतीय जनता पार्टी
२०. रक्षा खडसे, भारतीय जनता पार्टी
२१. रामदास आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले
२२. के. अन्नामलाई, भारतीय जनता पार्टी (होल्ड)
२३. मनोहरलाल खट्टर, भाजप
२४. राव इंद्रजीत सिंह, भारतीय जनता पार्टी
२५. सुरेश गोपी, भारतीय जनता पार्टी
२६. ज्युएल ओरम, भारतीय जनता पार्टी
२८. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पार्टी
२९. किशन रेड्डी, भारतीय जनता पार्टी
३०. बंडी संजय कुमार, भारतीय जनता पार्टी
३१. गिरिराज सिंह,भारतीय जनता पार्टी
३२. रवनीत बिट्टू,भारतीय जनता पार्टी
मोदी 3.0 च्या संभाव्य मंत्र्यांना शपथविधीसाठी कॉल आले आहेत. यामध्ये चार माजी मुख्यमंत्री राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल, कुमारस्वामी यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय मोदी 2.0 मध्ये मंत्री असलेले नितीन गडकरी, पियुष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया, अर्जुन राम मेघवाल यांना पुन्हा जबाबदारी मिळणार आहे.
राम मोहन हेही टीडीपीकडून मंत्री होणार हे निश्चित आहे. २६ वर्षीय राममोहन हे भारतातील सर्वात तरुण मंत्री असतील.
LJP(R) चे चिराग पासवान, जेडीयूचे रामनाथ ठाकूर आणि ललन सिंग, एचएएमचे जीतन राम मांझी आणि अपना दल (एस) च्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांनाही मंत्री केले जाऊ शकते.
माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि राव इंद्रजीत यांनाही हरियाणातून फोन आले आहेत. मंत्रिमंडळातील यूपी, राजस्थान आणि गुजरातचा वाटा कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.
नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी सकाळी त्यांनी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
शपथ घेऊन मोदी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या विक्रमाची बरोबरी करतील. नेहरू विजयी झाले आणि 1952, 1957 आणि 1962 मध्ये सलग तीन वेळा पंतप्रधान झाले. मात्र, नेहरूंच्या सरकारकडे पूर्ण बहुमत होते. मोदींची तिसरी इनिंग युतीच्या जोरावर चालणार आहे.
देशात १९९० च्या दशकापासून युतीचे राजकारण सुरू आहे. 2014 मध्ये आणि पुन्हा 2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने तो मोडला. तथापि, 2024 मध्ये भाजपला 240 जागा झाल्या आणि बहुमतासाठी मित्रपक्षांची गरज होती.
7 जून रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत एनडीएच्या नेत्यांनी मोदी यांची नेता म्हणून निवड केली. आता शपथविधीची प्रतीक्षा आहे. या सोहळ्याला चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वगळता श्रीलंका, बांगलादेश, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस, नेपाळ आणि भूतान या 7 देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.