पुणे-दुबईवरुन अालेल्या स्पाईस जेटच्या एसजी-५२ या विमानातून पुणे विमानतळावर अालेल्या एका संशयित प्रवाशाची कस्टम विभागाने झडती घेतली. त्यावेळी त्याच्या व्यैक्तिक झडतीत व सामनाच्या तपासणीत काहीही अाक्षेपार्ह मिळून अाले नाही. परंतु प्रवाशाचे वर्तन हे अतिशय संशयास्पद वाटल्याने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताे विमानातून ज्या सीटवर बसून अाला त्याची झडती घेतली गेली. त्यावेळी ताे बसलेल्या सीटखाली पाईप मध्ये साेन्याच्या पेस्टचे एक लपवून ठेवलेले पाकीट मिळून अाले. त्याची तपासणी केली असता, त्यात ७८ लाख एक हजार रुपये किंमतीचे २४ कॅरेट १०८८.३० ग्रॅम वजनाचे साेने मिळून अाल्याची माहिती कस्टम विभागाने दिली अाहे.
याप्रकरणी संबंधित संशयित प्रवासीला अटक करुन त्याच्याकडे चाैकशी सुरु करण्यात अाली अाहे. कस्टम विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, पाच जून राेजी दुबई येथून स्पाईस जेटचे एक विमान पुणे विमानतळावर अाले. विमानातील सर्व प्रवासी उतरुन अाल्यावर त्यांच्या सामानासह कस्टम विभागाने पाहणी केली. त्यावेळी एका प्रवाशाची हालचाल संशयास्पद दिसून अाली. त्यामुळे त्याची व्यैक्तिक झडती घेऊन त्याची सामानाची तपासणी केली गेली. परंतु त्यात काेणती अाक्षेपार्ह गाेष्ट मिळून अाली नाही.
त्याचे वर्तन हे अतिशय संशयास्पद दिसून अाल्याने त्याने विमानात काही लपवले अाहे का? अशी विचारणा अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे केली. परंतु त्याच्या उत्तरामुळे संशय अाणखी वाढला त्यामुळे कस्टम विभागाचे पथकाने विमानात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरवले व त्यानुसार ते तपासणीस गेले. त्यावेळी विमानातील प्रवासी बसलेला सीटसह इतर काही जागी शाेधाशाेध करण्यात अाली. त्यावेळी प्रवासी बसलेला सीटखाली पाईपात साेन्याचे पेस्टचे एक पाकीट मिळून अाले. त्याची तपासणी केली असता त्यात ७८ लाख एक हजार रुपये किंमतीचे १०८८.३० ग्रॅम वजनाचे साेने मिळून अाले अाहे. याबाबत पुढील तपास पुणे कस्टम विभाग करत अाहे.