मुंबई: मोदींसारख्या तपस्वी माणसाला 800 जागा मिळाल्या पाहिजेत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी एक्सिट पोलचीही खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला 800,900 जागाही देतील असे राऊत म्हणालेत. शिवाय त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीला 35 जागा मिळतील असा दावा केला आहे.संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या ध्यानावरून टीका केली आहे. ”एक्झिट पोलमध्ये सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील. कारण मोदींनी एवढे मोठे ध्यान केले आहे. मोदींनी साधना केली, तपस्या केली. त्याप्रमाणे 360 आणि 370 जागा काहीच नाहीत. मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा तरी मिळाल्या पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागेल”, असे राऊत म्हणालेते पुढे म्हणाले की, अत्यंत फसवणुकीचा हा एक्झिट पोल आहे. गेल्या काही वर्षात ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल चुकीचे ठरत आहेत. भारतीय जनता पक्ष, गृह मंत्रालय आणि यंत्रणा यावर कशा प्रकारे प्रभाव टाकत आहे हे सर्वांना माहिती आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या 24 तासात किमान 180 जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून जवळजवळ धमकावले आहे. जर तुम्हाला जिंकण्याची खात्री असेल तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाही. धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार आहे”, असे राऊत म्हणाले.तसेच राऊतांनी देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. ”कोणी कितीही आकडे समोर आणले तरी एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी 35 प्लस जागा मिळणार आहेत. तसेच सध्या मोठे मोठे जे पक्ष आहेत, जे सत्तेवरती आहेत, ते पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणत आहेत”, असेही राऊत म्हणालेत
एक्झिट पोल फ्रॉड, भाजपाला 900 जागाही देतील, संजय राऊत यांचा हल्ला
Date: