नवी दिल्ली:
लोकसभा निवडणूक-2024च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात शनिवारी (1 जून) 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांवर मतदान होणार आहे. 2019 मध्ये, या जागांपैकी भाजप जास्तीत जास्त 25, TMC 9, BJD 4, JDU आणि अपना दल (S) प्रत्येकी 2, JMM फक्त 1 जागा जिंकू शकले. केवळ पंजाबमुळे काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या.
या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, दोन केंद्रीय मंत्री आरके सिंह आणि अनुराग ठाकूर रिंगणात आहेत. ४ कलाकार- कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद हेदेखील निवडणूक लढवत आहेत.
याशिवाय ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी, अफजल अन्सारी, विक्रमादित्य सिंग हेही नशीब आजमावत आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सातव्या टप्प्यात 904 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 809 पुरुष आणि 95 महिला उमेदवार आहेत.
या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार हरसिमरत कौर बादल या पंजाबमधील भटिंडा येथील उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 198 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
लोकसभेच्या 542 जागांपैकी सहाव्या टप्प्यापर्यंत 485 जागांवर मतदान झाले आहे. शेवटच्या 57 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे.
गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी बिनविरोध निवडणूक जिंकली आहे, त्यामुळे केवळ 542 जागांवर मतदान होत आहे.