Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम येथे देशातील सर्वांत मोठी ‘फ्लेमिंगो सिटी’

Date:

जादुई नगरीत घेऊन जाणारी २८ फूट उंच फ्लेमिंगोची भव्यदिव्य कलाकृती

पुणे, ता. २७ मे फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियममध्ये देशातील सर्वांत मोठी फ्लेमिंगो सिटी उभारण्यात आली आहे. कलात्मकता, नाविन्य आणि पर्यावरणीय जाणीव यांचा मिलाफ असणारी ही कलाकृती भारावून टाकणारी आहे. येथे देशातील सर्वांत मोठा २८ फूटाचे फ्लेमिंगोचे शिल्प साकारण्यात आले आहे. गुलाबी रंगातील अतिशय आकर्षक असे हे फ्लेमिंगोचे शिल्प सर्वांच्या नजरा खिळवून ठेवते. ही फ्लेमिंगो सिटी आशादायी भवितव्य, प्रगती आणि बदलाच्या सौंदर्याचे जिवंत प्रतीक आहे.

एलिमेंटा डिझाईन्सने ही अनोखी संकल्पना मांडली असून, त्यावर आधारित या फ्लेमिंगो सिटीचे डिझाइनही केले आहे. अफाट कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेच्या सामर्थ्याचा हा पुरावा आहे. ग्रीष्म ऋतूची सखोल माहिती, वसंत ऋतुची चैतन्यदायी प्रेरणा घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साकारलेली ही सिटी शहरी जीवनातील वैविध्य टिपते. वास्तव आणि कल्पनारम्य जग यांच्यातील रेषा अस्पष्ट करणारी ही फ्लेमिंगो सिटी इथे भेट देणाऱ्यांना स्वत: च्या कल्पनाशक्तीची क्षमता जाणून घेण्याची प्रेरणा देते. 

फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियमचे केंद्रसंचालक विक्रम पै  म्हणाले, “या नव्या फ्लेमिंगो सिटीचा अनुभव लोकांसमोर सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  ही सुंदर, आकर्षक रचना शांतता आणि प्रसन्नता यांचा विलक्षण अनुभव देते. सौंदर्यशास्त्राच्या पलीकडे पर्यावरणीय जाणीवेप्रति असलेल्या आमच्या बांधिलकीचे हे प्रतीक आहे. आकर्षक रंगछटा असलेले आणि लयबद्ध हालचाली करणारे देखणे फ्लेमिंगो केवळ शोभेची वस्तू नाहीत, तर  ते आपल्या पर्यावरणीय परिसंस्थेचे राजदूत आहेत. ते आपल्या ग्रहावरील जीवन टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक संतुलनाची आठवण करून देतात. फ्लेमिंगो या संकल्पनेवर आधारित सजावटीद्वारे फ्लेमिगोंचा अधिवास जतन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवण्याचे आमचे ध्येय आहे.

निसर्गाचे चमत्कार वाचविण्यासाठी आपण एकत्र येऊन निसर्गाप्रती आपली सामूहिक जबाबदारी पूर्ण करूया, असे आवाहनही त्यांनी केले.

या अनेक मजली भव्य मॉलमध्ये फ्लेमिंगो सिटीसारख्या आकर्षक ठिकाणासह आलिशान सजावटीसह उंच छत आणि मंद प्रकाशयोजनेची कलात्मकता अनुभवता येते. आलिशानता, उंची सजावट याचा एक परिपूर्ण अनुभव येथे मिळतो.

मॉल ऑफ मिलेनियम बद्दल:

·       १६ एकर जमिनीवर पसरलेले १२ लाख चौरस फूटाचे क्षेत्र समाविष्ट करणारे एक भव्य, आकर्षक ठिकाण

·       ३५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे घर, जे उत्कृष्ट खरेदीचा अनुभव देतात.

·       आयनॉक्स, फॅन पार्क, टाइम झोन आणि फनसिटी यांसारख्या आकर्षणांसह एक लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले भव्य मनोरंजन क्षेत्र 

·       ७५ पेक्षा जास्त फूड अँड बेव्हेरेजेसच्या पर्यायांसह, जेवणाच्या विविध पर्यायांची उपलब्धता

·       शाश्वततेच्या वचनबद्धतेसह ऐतिहासिक वारसा असलेल्या शहराचे प्रवेशद्वार म्हणून हा मॉल ओळख निर्माण करत आहे

·       आयटी हबच्या उत्साही उर्जेसह पुण्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा अखंडपणे मिसळत आहे

·       दहा हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा

·       आर्थिक वर्ष २०२५पासून सुरू होणाऱ्या १४ लाख चौरस फूटांवरील आधुनिक कार्यालयांच्या समावेशामुळे आणखी विस्तार होणार

·       फिनिक्स मॉल लि.ने  कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्डसह संयुक्त उपक्रमांतर्गत ३० हजार चौरस फुटांमध्ये पसरलेला मॉल विकसित केला आहे.

·       फिनिक्स मॉल लि.कडे आज भारतातील आठ प्रमुख शहरांमधील १२  केंद्रांमध्ये १.१ कोटी चौरसफूटपेक्षा जास्त भाडेपट्टी क्षेत्राचा कार्यरत रिटेल पोर्टफोलिओ आहे.

फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम, पुणे येथे भारतातील सर्वांत मोठ्या फ्लेमिंगो सिटीच्या वैभवाचा अनुभव घ्या !

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माळेगाव कारखाना:अजित पवार यांचाच दबदबा

पुणे/बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग

अधिक माहिती घेतली असतामहिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या...

अकरावी प्रवेश: निवड यादी गुरुवारी

पुणे-इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या प्रक्रियेतील पहिल्या नियमित 'कॅप' फेरीतील निवड...

उद्या धनकवडीत पाणी पुरवठा बंद —

पुणे-आंबेगाव फाटा, धनकवडी येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे...