पुणे-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात दहावीचा 95.81% निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच दहावीच्या निकालात बाजी मारली आहे. यंदा 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभाग आघाडीवर आहे. गतवर्षी हा निकाल 93.83% होता यंदा त्यात 1.78% टक्के वाढ झाली आहे.पुणे विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल विभागीय अध्यक्ष मंजुषा मिसकर आणि विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी सोमवारी जाहीर केला. पुणे विभागात २ लाख ६२ हजार ९४९ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षा दिली होती. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ५३ हजार ६०० आहे. उत्तीर्णतेच्या निकालाची टक्केवारी ९६.४४ आहे. पुणे विभागात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण २.५१ टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी हा निकाल ९५.३५ टक्के इतका होता.
पुणे विभागातून रीपीटर अर्थात पुनर्परीक्षार्थी म्हणून दहावी परीक्षेला पुणे विभाग ६ हजार ९९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४ हजार ९११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी ८०.११ इतकी आहे. नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यााच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९५.३७ इतकी आहे.
पुणे जिल्हा
नोंदणी केलेल्याची संख्या : १ लाख ३१ हजार ३४५
परीक्षेला बसलेल्याची संख्या : १ लाख ३० हजार ८४२
उत्तीर्णांची संख्या : १ लाख २७ हजार ३१४
उत्तीर्णाची टक्केवारी : ९७.३०
नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल
यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. तसेच यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21 टक्के आहे. तर 94.56 टक्के ही मुलांची उत्तीर्ण टक्केवारी आहे. याशिवाय 16 लाख 21 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 15 लाख 17 हजार 802 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.25%
तसेच 9078 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 8465 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.25 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 99.00% तर नागपूर विभागाचा 94% असा सर्वात कमी निकाल लागला आहे. विशेष म्हणजे 72 पैकी 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
राज्यातील नऊ विभागांमधून तब्बल 187 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. यापैकी सर्वाधीक 100 टक्के प्राप्त केलेले विद्यार्थी लातूरमधील आहेत. लातूर विभागात तब्बल 123 विद्यार्थ्यांना 1 ट00क्के प्राप्त झाले आहेत. तर दहावीच्या निकालात 1 लाख 84 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण मिळवले आहेत.
विभागनिहाय निकाल
पुणे – 96.44%
नागपुर – 94.73%
छत्रपती संभाजीनगर – 95.19%
मुंबई – 95.83%
कोल्हापूर – 97.45%
अमरावती – 95.58%
नाशिक – 95.28%
लातूर – 95.27%
कोकण – 99.01%