पुणे पिंपरी चिंचवड-रिक्षा टॅक्सीसह इतर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळेत पासिंग न केल्यामुळे फिटनेस साठी प्रत्येक दिवशी पन्नास रुपये दंड सरकारच्या वतीने जाहीर केला आहे, असा आदेश देखील नुकताच परिवहन आयुक्ताने यांनी दिला असून महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयामध्ये मध्ये अशा स्वरूपाचा दंड घेणे सुरू झाले आहे,या विरोधात पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी येत्या आठ दिवसांमध्ये हा दंड रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन करून पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून महाराष्ट्रभर चक्काजाम करू असा इशारा ऑटो कृती समितीचे महाराष्ट्राचे नेते व महाराष्ट्र रिक्षा पंचायत चे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये दिला,
यावेळी, मनसे वाहतूक विभागाचे पुणे शहराध्यक्ष किशोर चिंतामणी, पुणे रिक्षा फेडरेशन अध्यक्ष आनंद तांबे, शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष अशोक साळेकर, उपाध्यक्ष आबा बाबर, भाजप रिक्षा आघाडी अध्यक्ष अंकुश नवले, टेम्पो संघटनेचे अध्यक्ष प्रकाश झाडे, सावकाश रिक्षा संघ अध्यक्ष प्रदीप भालेराव, आझाद रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शफिक पटेल, ह राष्ट्रवादी रिक्षा संघटना पुणे शहराध्यक्ष बापू धुमाळ, एम आय एम रिक्षा संघटना कार्याध्यक्ष महमूद शेख, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख, कृती समिती समन्वय तुषार पवार, विलास खेमसे, कुमार शेट्टी, सुनील मालुसरे, आधी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते ,
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, पुणे शहरांमध्ये एका बिल्डराच्या मुलाने पार्श गाडीखाली चिल्ड्रन दोन व्यक्तींना जीवे मारले अशावेळी, श्रीमंत बिल्डरचा मुलगा आहे म्हणून त्याच फक्त निबंध लिहण्याची शिक्षा देण्यात आले, आणि हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब रिक्षा चालकांना मात्र लेट पासिंग केली म्हणून लाखो रुपये दंड लावण्यात येत आहे, अनेक रिक्षा चालकांना एक लाखापेक्षा अधिक दंड आला आहे, रिक्षाच्या किमतीपेक्षा अधिक हा धंदा असून एवढ्या मोठा दंड भरायचा कसा असा प्रश्न रिक्षा चालकांसमोर आहे, हा सर्व प्रकार चिड असून सरकारी कुणासाठी चालवलं जात आहे असा प्रश्न पडत आहे,
या प्रश्नांबाबत महाराष्ट्रातील वीस लाख ऑटो चालक मालकांच्या भावना तीव्र असून महाराष्ट्रातील प्रत्येक आरटीओला विविध संघटनांनी निवेदन दिले आहे येथे आठ दिवसांमध्ये हा प्रश्न न सुटल्यास पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करून चक्काजाम करण्यात येईल अशा यावेळी बाबा कांबळे म्हणाले,