Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘तो’ व्हायरल व्हिडीओ तयार करून प्रसारित करणाऱ्याला पोलीस देणार दणका

Date:

पुणे- कल्याणी नगर, येरवडा पुणे येथे केलेल्या अपघाताच्या अनुषंगाने आक्षेपार्ह व अश्लिल वक्तव्ये असलेली रिल इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्यावर पुणे पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुरनं ४३०/२०२४, भादवि कलम ५०९,२९४(ब) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील कर्तव्यास असलेल्या महिला पोलीस फौजदार स्नेहल अडसूळे या दि. २३/०५/२०२४ रोजी कर्तव्यास असताना त्यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट सर्चिंग करत असताना त्यांना एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर कल्याणीनगर, येरवडा पुणे येथील झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने समाजातील स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे व नितीभ्रष्ट करणारे अश्लिल वक्तव्ये असलेली रिल पोस्ट केल्याचे दिसून आले. म्हणून सदर रिल तयार करणारे व सदरची रिल इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसारीत करणारे इन्स्टाग्राम अकाऊंट वर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्हयाचा तपास हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन सुरेश शिंदे, हे करीत आहेत. इन्स्टाग्राम कंपनीस दोन्ही इन्स्टाग्राम अकाऊंटची युआरएल तसेच वादग्रस्त रिल ची युआरएल पाठवून सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. माहिती प्राप्त होताच तीचे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयातील मुळ आरोपीतांपर्यत पोहोचण्याकरीता प्रयत्नशील आहोत.
सदर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे आर.एन. राजे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, म. पोलीस निरीक्षक श्रीमती मिनल सुपे-पाटील व सायबर पोलीस स्टेशन कडील स्टाफ हे करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२८ वे वर्ष...

आत्महत्या प्रतिबंधासाठी स्वयंसेवक प्रशिक्षण

पुणे: आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देऊ इच्छिणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून...

त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिली….

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य...